बीड: शहरातील स्वराज्य नगर येथे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह.भ.प. माधव महाराज डाके यांच्याकडे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही चातुर्मास उत्सव मोठ्या भक्त

बीड: शहरातील स्वराज्य नगर येथे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह.भ.प. माधव महाराज डाके यांच्याकडे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही चातुर्मास उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात व आनंदात साजरा करण्यात येणार आहे.
या चातुर्मास उत्सवानिमित्त पहिल्या प्रवचन सेवेचा मान दैनिक चंपावती पत्रचे पत्रकार व ज्ञानेश्वरीचे ग्रंथप्रेमी तथा माऊली ज्ञानोबाराय व तुकोबारायांच्या विचारावर नितांत श्रद्धा असणारे ह.भ.प. महादेव (नाना) साळुंके यांना प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही मिळाला आहे.
या चातुर्मास उत्सवात प्रत्येक सोमवारी रात्री ८.०० ते ९.०० या वेळेत बीड जिल्ह्यातील नामवंत, प्रज्ञावंत ज्ञानेश्वरी अभ्यासक व कीर्तनकार महाराजांची प्रवचन सेवा आयोजित केली जाते. यावर्षी चातुर्मास उत्सवाचा शुभारंभ आषाढ शुद्ध त्रयोदशी, सोमवार, दि. २७ जुलै २०२६ रोजी होणार असून, पहिल्या दिवशीची प्रवचन सेवा दैनिक चंपावती पत्रचे प्रतिनिधी व ज्ञानेश्वरी अभ्यासक ह.भ.प. महादेव (नाना) साळुंके यांची आयोजित करण्यात आली आहे. सदरील प्रवचन सेवेचे थेट प्रक्षेपण ‘माधव महाराज डाके’ या फेसबुक पेजवर उपलब्ध असणार आहे.

COMMENTS