Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगाव तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा; मोफत भाजीपाला वाटप करून निषेध

शेवगाव : भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांना फक्त अकरा वाजेपर्यंत बसण्याची मर्यादा घालून त्यानंतर त्यांना हाकलून देण्याच्या नगर परिषदेच्या निर्णयाविरोधात काल (दि.16) शेवगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या संदर्भात यापूर्वी दि.5 रोजी तहसीलदार यांना मोफत भाजीपाला वाटप आंदोलनाचे निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही नगर परिषदेच्या निर्णयात कोणताही बदल न झाल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयात मोफत भाजीपाला वाटप करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांना भाजी मंडईमध्ये दिवसभर बसून आपला भाजीपाला विक्री करण्याची परवानगी द्यावी, तसेच शेतकऱ्यांना जबरदस्तीने हाकलून देण्याची प्रथा तात्काळ बंद करावी, अशी मागणी केली. अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, वंचित आघाडीचे प्यारेलाल शेख, मराठा संघाचे राजू घनवट, काँग्रेसचे समद काझी, बाबुलाल शेख, संतोष कांबळे आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

संजीवनी फार्मसीच्या १२ विद्यार्थ्यांना नोकरी 
जिजाऊ ब्रिगेड ‘एकविरा’ चषकचे मानकरी; संगमनेरमधील क्रीडा महोत्सवाची उत्साहात सांगता
कोपरगावमधील ४८ कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार; आ. काळे यांच्या पाठपुराव्यातून मिळाले यश

शेवगाव : भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांना फक्त अकरा वाजेपर्यंत बसण्याची मर्यादा घालून त्यानंतर त्यांना हाकलून देण्याच्या नगर परिषदेच्या निर्णयाविरोधात काल (दि.16) शेवगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

या संदर्भात यापूर्वी दि.5 रोजी तहसीलदार यांना मोफत भाजीपाला वाटप आंदोलनाचे निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही नगर परिषदेच्या निर्णयात कोणताही बदल न झाल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयात मोफत भाजीपाला वाटप करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांना भाजी मंडईमध्ये दिवसभर बसून आपला भाजीपाला विक्री करण्याची परवानगी द्यावी, तसेच शेतकऱ्यांना जबरदस्तीने हाकलून देण्याची प्रथा तात्काळ बंद करावी, अशी मागणी केली. अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, वंचित आघाडीचे प्यारेलाल शेख, मराठा संघाचे राजू घनवट, काँग्रेसचे समद काझी, बाबुलाल शेख, संतोष कांबळे आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS