Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

ॲसिड हल्ल्यातील चिमुकलीला न्याय द्या; संगमनेरमध्ये भव्य रस्ता रोको ; कठोर शिक्षेची मागणी

संगमनेर : वडगाव पान येथील तेरा वर्ष वयाच्या शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या भ्याड ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय नागरिक व परिसरातील महिला, विद्यार्थिनी युवक यांनी एकत्र येऊन हल्ल्याचा तीव्र निषेध करत भव्य रास्ता रोको आंदोलन केले. त्याचबरोबर संगमनेर तालुक्यात चालले काय ? असा सवाल करताना आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करताना महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी सरकारने कडक कायदे करावे अशी आग्रही मागणी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी केली आहे. वडगाव पान येथील तळेगाव फाटा येथे सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ.जयश्री थोरात, नगराध्यक्ष डॉ.मैथिली तांबे,  दुर्गाताई तांबे,बाबा ओहोळ,  बाळासाहेब गायकवाड,  पद्माताई थोरात, विक्रम ओहोळ यांच्यासह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते व वडगाव पान मधील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  वडगाव पान वरील चिमुकलीच्या हल्ल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी एकत्र येऊन तळेगाव फाटा येथे भव्य आंदोलन केले. यावेळी आरोपीला तातडीने अटक करा, ईश्वरी ला न्याय द्या अशा घोषणा देण्यात आला. तीनही बाजूने वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या.  या आंदोलनात बोलताना डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, लहानग्या चिमुकलीवर झालेला ॲसिड हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेतील आरोपीला प्रशासनाने तातडीने शोधून कठोर शिक्षा केली पाहिजे. जेणेकरून पुढचा आरोपी असे गुन्हा करणार नाही. ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी निवेदन स्वीकारले याचबरोबर आरोपीचा लवकरात लवकर शोध लावण्यासाठी पोलीस प्रशासन काम करत असल्याचे ते म्हणाले यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मुलीच्या उपचाराचा सर्व खर्च ‘एसएमबीटी’ करणार  घटना घडल्यानंतर डॉ.जयश्री थोरात व माजी आ.डॉ.सुधीर तांबे यांनी प्रवरा हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलीची चौकशी केली. याचबरोबर नातेवाईकांना धीर दिला या मुलीच्या दवाखान्याचा उपचाराचा सर्व खर्च एसएमबीटी संस्था करणार असून अत्याधुनिक टेक्नॉलॉजी द्वारे सर्जरी किंवा डोळ्याच्या आरोग्याबाबत डॉ.जयश्री  थोरात यांनी मुंबई येथील प्रतीथयश डॉ. रानडे विविध डॉक्टरांशी संपर्क केला आहे. या भ्याड हल्ल्याचा संगमनेर तालुक्यातून सर्व क्षेत्रातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

आंबीजळगावात मध्यरात्री दरोडेखोरांचा धुमाकूळ; दोन घरांवर दरोडा, ५८ हजारांचा ऐवज लंपास
संगमनेरमध्ये तरुणीवर चाकूने वार; हल्लेखोराने शेततळ्यात घेतली उडी
जीवघेण्या हल्ल्यांतील आरोपी २४ तासांत जेरबंद; परस्परविरोधी गुन्ह्यांत शेवगाव पोलिसांची धडक कारवाई; मुख्य आरोपींना अटक

संगमनेर : वडगाव पान येथील तेरा वर्ष वयाच्या शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या भ्याड ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय नागरिक व परिसरातील महिला, विद्यार्थिनी युवक यांनी एकत्र येऊन हल्ल्याचा तीव्र निषेध करत भव्य रास्ता रोको आंदोलन केले. त्याचबरोबर संगमनेर तालुक्यात चालले काय ? असा सवाल करताना आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करताना महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी सरकारने कडक कायदे करावे अशी आग्रही मागणी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी केली आहे.

वडगाव पान येथील तळेगाव फाटा येथे सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ.जयश्री थोरात, नगराध्यक्ष डॉ.मैथिली तांबे,  दुर्गाताई तांबे,बाबा ओहोळ,  बाळासाहेब गायकवाड,  पद्माताई थोरात, विक्रम ओहोळ यांच्यासह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते व वडगाव पान मधील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 वडगाव पान वरील चिमुकलीच्या हल्ल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी एकत्र येऊन तळेगाव फाटा येथे भव्य आंदोलन केले. यावेळी आरोपीला तातडीने अटक करा, ईश्वरी ला न्याय द्या अशा घोषणा देण्यात आला. तीनही बाजूने वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या.

 या आंदोलनात बोलताना डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, लहानग्या चिमुकलीवर झालेला ॲसिड हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेतील आरोपीला प्रशासनाने तातडीने शोधून कठोर शिक्षा केली पाहिजे. जेणेकरून पुढचा आरोपी असे गुन्हा करणार नाही. ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी निवेदन स्वीकारले याचबरोबर आरोपीचा लवकरात लवकर शोध लावण्यासाठी पोलीस प्रशासन काम करत असल्याचे ते म्हणाले यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

मुलीच्या उपचाराचा सर्व खर्च ‘एसएमबीटी’ करणार

 घटना घडल्यानंतर डॉ.जयश्री थोरात व माजी आ.डॉ.सुधीर तांबे यांनी प्रवरा हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलीची चौकशी केली. याचबरोबर नातेवाईकांना धीर दिला या मुलीच्या दवाखान्याचा उपचाराचा सर्व खर्च एसएमबीटी संस्था करणार असून अत्याधुनिक टेक्नॉलॉजी द्वारे सर्जरी किंवा डोळ्याच्या आरोग्याबाबत डॉ.जयश्री  थोरात यांनी मुंबई येथील प्रतीथयश डॉ. रानडे विविध डॉक्टरांशी संपर्क केला आहे. या भ्याड हल्ल्याचा संगमनेर तालुक्यातून सर्व क्षेत्रातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

COMMENTS