Homeताज्या बातम्या

अण्णा भाऊ साठेंचे साहित्य प्रेरणादायी; शहरटाकळी येथे १०६ वी जयंती उत्साहात साजरी

शहरटाकळी: अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेल्या साहित्यावर अनेक विद्यापीठांकडून संशोधन व प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या साहित्याचे केवळ भारतातच न

लोकमंथन इफेक्ट : उघड्या विहिरीला बांधले संरक्षण कठडे; घारगाव-पिंपळगाव पिसा रस्त्यावरील संभाव्य धोका टळला
संत गोरोबा काकांच्या ७५९ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये भव्य शोभायात्रा; गुणवंतांचा होणार गौरव
नीट प्रकरणावरून मुंबईत २६ जुलैला मोर्चाची हाक; विद्यार्थी-पालकांनी सहभागी होण्याचे ठाकरे बंधूंचे आवाहन

शहरटाकळी: अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेल्या साहित्यावर अनेक विद्यापीठांकडून संशोधन व प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या साहित्याचे केवळ भारतातच नव्हे तर परदेशी भाषांमध्येही भाषांतर झाले असून हजारो वाचकांनी त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची अक्षरशः पारायणे केली आहेत. सर्वसामान्य माणसाविषयीची आंतरिक तळमळ आणि सुख-दुःखांचे वास्तव चित्रण त्यांच्या साहित्यातून प्रकट होते. अण्णाभाऊंच्या साहित्याने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे, असे प्रतिपादन माजी ग्रामपंचायत सदस्य व जयंती उत्सव समितीचे प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी केले.

शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची १०६ वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ॲड. अनिल मडके, उपसरपंच राजेंद्र खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब राऊत, भगवानराव खरमाळे, भाऊसाहेब मडके, वाय. डी. कोल्हे, मानीयल कोल्हे, संतोष कोल्हे, रामचंद्र गिरम, रवींद्र मडके आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दादा चव्हाण, विशाल चव्हाण, अभिषेक चव्हाण, सौरव चव्हाण, दीपक चव्हाण, गौरव मिसाळ, साहेबराव चव्हाण, पांडुरंग चव्हाण, योसेफ चव्हाण, अभय चव्हाण, साईनाथ चव्हाण, अमर चव्हाण, सचिन चांदणे आदींनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी ग्रामस्थ व तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS