Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एअर इंडिया एक्स्प्रेसचे 78 उड्डाणे रद्द

तब्बल 200 कर्मचार्‍यांची मारली सामूहिक दांडी

मुंबई ः टाटा समूहाच्या एअर इंडिया एक्सप्रेसला बुधवारी 78 विमानांचे उड्डाणे रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. विशेष म्हणजे तब्बल 200 कर्मचार्‍यांन

पुण्यात 1100 कोटींचे ड्रग्ज जप्त
स्नेहलताताई कोल्हे यांची दिवाळीची खरेदी स्थानिक बाजारपेठेत
पुण्यात कोयता गँगविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम

मुंबई ः टाटा समूहाच्या एअर इंडिया एक्सप्रेसला बुधवारी 78 विमानांचे उड्डाणे रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. विशेष म्हणजे तब्बल 200 कर्मचार्‍यांनी आजारपणाचे कारण देत सामूहिक दांडी मारल्यामुळे एअर इंडियाला उड्डाणे रद्द करावे लागले आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच विस्तारा एअरलाईन्सच्या नाराज वैमानिकांनी सामूहिक दांडी मारल्यामुळे विस्तारा एअरलाईन्सला अनेक उड्डाणे रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. त्यानंतर महिन्याभराच्या आतच ही नामुष्की एअर इंडियावर देखील ओढवली आहे. वास्तविक एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचे विलिनीकरण होणार असून या मुळे नोकरी धोक्यात येणार असल्याची भावना दोन्ही एअरलाईन्सच्या वैमानिक आणि केबिन क्रूच्या कर्मचार्‍यांची आहे. त्यामुळे हे कर्मचारी या विलीनीकरणाला विरोध करून त्यामुळे कर्मचारी सामूहिक रजेवर गेले असल्याची माहिती समोर येत आहे. एअर इंडियाच्या कर्मचर्‍यांच्या रजेमुळे मात्र प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती. एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, कालपासून शेवटच्या क्षणी आमचे काही कर्मचारी आजारी पडले असल्याचा निरोप आम्हाला मिळाला. त्यामुळे काही विमानांचे उड्डाण आम्हाला रद्द करावे लागत आहे. दरम्यान आम्ही कर्मचार्‍यांशी संवाद साधून यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्या प्रवाशांना याचा फटका बसला आहे, त्यांना तिकीटाचे पैसे परत केले जातील किंवा त्यांची इच्छा असल्यास पुन्हा नवी तिकीटे त्यांना दिली जातील, असेही या निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आम्ही समिति नेमली असून आम्ही क्रू मेंबर्ससोबत बोलत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी आमची टीम वेगानं काम करत आहे, असे देखील कंपनीने म्हटले आहे.

नोकरी धोक्यात असल्यामुळे कर्मचार्‍यांची दांडी – एअर इंडिया एक्सप्रेस आणि एयर इंडिया यांच्या विलीनिकरणाचे वृत्त आहे. या कंपनीत काही दिवसांपासून केबिन क्रू कर्मचार्‍यांची देखील कमतरता आहे. काही कर्मचार्‍यांनी टाटा समूहाच्या मालकी असलेल्या या विमान कंपनीत गैरव्यवस्थापन होत असल्याचा आरोप केला आहे. याचा  निषेध करण्यासाठी अनेक कर्मचारी हे आजारी असल्याचे कारण देत सामूहिक रजेवर केले आहेत. एअर इंडियामध्ये एक्स कनेक्ट कंपनीच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आपल्या नोकर्‍या धोक्यात येतील अशी कंपनीच्या कर्मचार्‍यांची भावना आहे.

COMMENTS