Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोतुळमध्ये शिवदाहिनीवर चोरट्यांनी मारला डल्ला

अकोले ः अकोले तालुक्यातील कोतुळ येथे मंगळवारी रात्री चोरट्यांनी शिवदाहिनीवर डल्ला मारला. बुधवारी सकाळी ही घटना उघकीस आली. सोने दागिने अशा वस्तू  

ग्रामस्थांनी रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात खासदारांची अडवली गाडी
कडक टाळेबंदी पाळणे सर्वांच्या हिताचे : नगराध्यक्ष वहाडणे
संजीवनीच्या विद्यार्थ्यांना ‘विसेन इन्फोटेक’मध्ये नोकरी

अकोले ः अकोले तालुक्यातील कोतुळ येथे मंगळवारी रात्री चोरट्यांनी शिवदाहिनीवर डल्ला मारला. बुधवारी सकाळी ही घटना उघकीस आली. सोने दागिने अशा वस्तू  चोरी, घरफोडीच्या घटना अनेक घडतात परंतु चक्क चोरट्यांनी स्मशानभूमीतील शेव-दायिनीचे साहित्य चोरून नेले आहे.
कोतुळ येथे अंत्यविधीसाठी असणारा शव दाहीनीचा सांगाडा चोरट्यांनी चोरून नेला. हा खोडसाळ पणा म्हणावा की, चोरट्यांचा चोरीचा डल्ला म्हणावा असा प्रश्‍न केला जात आहे. चोर्‍या घर फोड्या  करून लाखो रुपये लुटल्याची घन घटना आपण ऐकतो मात्र स्मशान भूमीतील शेवदायिनीचा सांगाडा चोरून नेल्याची घटना ही नवलाईच म्हणावी लागेल कोतुळ ग्रामपंचायत सरपंच भास्कर लोकरे  प्रभारी ग्रामसेवक श्री दुशिंग यांनी  पोलिसांकडे चोरीची तक्रार नोंदवली आहे.

COMMENTS