12 व्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित र. भ. अट्टल महाविद्यालयात 21 जून रोजी सकाळी 6 ते 7 या वेळेत छत्रपती शिवा

12 व्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित र. भ. अट्टल महाविद्यालयात 21 जून रोजी सकाळी 6 ते 7 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन इनडोअर हॉलमध्ये योगदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाचा एन.सी.सी. विभाग, एन.एस.एस. विभाग, क्रीडा विभाग, रोटरी क्लब ऑफ गेवराई, पतंजली योग समिती आणि महाराष्ट्र योग शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अॅड. एच. एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राधेश्याम येवले, सेवानिवृत्त प्राचार्य राम महासाहेब, महाराष्ट्र शासन क्रीडा विभागाचे अधिकारी दीपक जगदाळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र बरकसे, सचिव प्रवीण जैन, भावी अध्यक्ष गणेश कुलकर्णी, पाथफाइंडर अकॅडमीचे प्रशिक्षक पवन राऊत, महाराष्ट्र योग शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अरुण परदेशी, सीता महासाहेब, प्रबंधक भास्कर सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते. रोपाला पाणी घालून तसेच योगमहर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला आंतरराष्ट्रीय योगदिन उपक्रम आज जगभर राबविला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. रजनी शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात पतंजली योग समितीचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र बरकसे यांनी योग प्रशिक्षण दिले. यावेळी यौगिक व्यायाम, शारीरिक हालचाली, ओंकार ध्वनी, गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, प्रार्थना मंत्र, संकल्प मंत्र, अन्नपूर्ण मंत्र तसेच गुरुमंत्राचे सामूहिक पठण करण्यात आले. उपस्थितांना विविध योगासने, कपालभाती, अनुलोम-विलोमसह आठ प्रकारच्या प्राणायामांचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. तसेच योगामुळे शरीर आणि मनाला होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सकाळी लवकर उठून नियमित व्यायाम, प्राणायाम, योगासने, जलतरण, सायकलिंग आणि चालण्याचा व्यायाम केल्याने जीवनशैलीत सकारात्मक बदल होतो. नियमित व शास्त्रोक्त पद्धतीने व्यायाम केल्यास मनुष्य निरोगी व तंदुरुस्त राहू शकतो, असे प्रतिपादन योगशिक्षक प्रा. राजेंद्र बरकसे यांनी केले. र. भ. अट्टल महाविद्यालयात दररोज सुरू असलेल्या योग वर्गाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमात महाविद्यालयाचा योगपटू सचिन मोहिते याने विविध कठीण योगासने सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. पतंजली योग शिक्षक सदस्य भीमजी पटेल, सीता महासाहेब, मिलिंद कुलकर्णी, सुरेश मानधने, प्रकाश गिरी आणि दत्तात्रय साळुंके यांनीही विविध योगासनांचे सादरीकरण केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन.सी.सी. विभागाचे लेफ्टनंट प्रा. अभिजीत तौर, एन.एस.एस. विभागप्रमुख प्रा. अरुण जाधव, क्रीडा विभागप्रमुख प्रा. अरुण भराडे, डॉ. रवींद्र खरात, सुदर्शन निकम, प्रा. सतीश जाधव तसेच रोटरी क्लबचे संचालक राजेंद्र डेंगे यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी शांतिपाठ, सिंहासन आणि हास्यासन घेऊन आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

COMMENTS