Homeताज्या बातम्या

फक्राबाद येथे दरोडा; दरोडेखोरांच्या मारहाणीत चौघे गंभीर, लाखो रुपयांचा ऐवज लंपास

जामखेड : तालुक्यातील फक्राबाद येथील आढाव वस्तीवर रविवारी मध्यरात्री ७ ते ८ अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने धाडसी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी घरातील चौ

कासारी येथे कृषी कन्यांचे आगमन; ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमाला सुरुवात
सीएसएमटीवर प्लॅटफॉर्मचा विस्तार सुरू; कोकणवासीयांचा परतीचा प्रवास त्रासदायक
बीड शहरातील शांहीशाह वली दर्गा परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मागणी; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

जामखेड : तालुक्यातील फक्राबाद येथील आढाव वस्तीवर रविवारी मध्यरात्री ७ ते ८ अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने धाडसी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी घरातील चौघांवर कोयता, लोखंडी गज आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला चढवला. यानंतर कपाटातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. या भीषण घटनेत चौघेजण गंभीर जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशल्या आण्णासाहेब आढाव (वय ४८) या आपल्या कुटुंबीयांसह घरासमोरील पडवीत झोपल्या होत्या. ३१ मे रोजी मध्यरात्री सव्वा एक वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या ७ ते ८ दरोडेखोरांनी कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात कौशल्या आढाव, अंगद आण्णासाहेब आढाव, मैनाबाई मधुकर पारे व सुभद्रा आण्णासाहेब आढाव गंभीर जखमी झाले. कौशल्या, अंगद आणि मैनाबाई यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे, तर सुभद्रा आढाव यांच्यावर जामखेड येथे उपचार सुरू आहेत.

मारहाणीनंतर दरोडेखोरांनी घरात घुसून सामानाची उचकपाचक केली आणि कपाटातील ४० हजार रुपये रोख तसेच साडेतीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. नागरिकांचा आरडाओरडा ऐकून दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS