Homeताज्या बातम्याबीड

आंबेडकरी चळवळीचे नेते मसू जाधव यांच्यावर सशस्त्र हल्ला; 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

आंबेडकरी चळवळीतील सक्रिय व सामाजिक न्यायासाठी सतत आवाज उठवणारे नेते मसू जाधव यांच्यावर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याकडून सशस्त्र हल्ला करण्यात आल

अंबाजोगाईत एस.एफ.आयकडून जलकुंड स्वच्छता मोहीम राबवली
भारत तोंडे यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवडमाजी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते नियुक्ती व सत्कार
तरुण, तडफदार व जिद्दी नेतृत्व असलेले अमर शेख यांची बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी निवड करावी – शाहेबाज कादरी यांची मागणी



आंबेडकरी चळवळीतील सक्रिय व सामाजिक न्यायासाठी सतत आवाज उठवणारे नेते मसू जाधव यांच्यावर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याकडून सशस्त्र हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या हल्ल्यात जाधव यांना मारहाण करण्यात आली असून त्यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेमुळे नाळवंडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना काल (दि.) रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास भीमनगर, नाळवंडी येथे घडली. एका युवकाला मारहाण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मसू जाधव हे आपल्या चार सहकार्‍यांसह संबंधित युवकाच्या घरी चौकशीसाठी गेले होते. यावेळी अचानक काही जणांनी घरात घुसून तू इथे कसा आला? अशी विचारणा करत जाधव व त्यांच्या सहकार्‍यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. हल्लेखोरांनी धमकी देत आज तुला जिवंत सोडणार नाही, हत्यार काढा, गोळ्या घाला अशा शब्दांत जीवघेण्या धमक्या दिल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात जाधव यांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली असून मोठे नुकसान झाले आहे. काही स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करून जाधव व त्यांच्या सहकार्‍यांची सुटका केली. त्यानंतर त्यांनी तत्काळ पिंपळनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, या घटनेमुळे सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच मसू जाधव यांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS