Homeताज्या बातम्याबीड

आंदोलना नंतर केज नगरपंचायतीचा 4.24 कोटींचा घरकुल घोटाळा उघडतत्कालीन मुख्याधिकार्‍यासह 6 जणांवर गुन्हा दाखल; जनतेत संताप

 गोरगरिबांच्या हक्काच्या घरांवर डल्ला मारणार्‍या केज नगरपंचायतीमधील एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा अखेर पर्दाफाश झाला आहे. प्रधानमंत्री आवास योज

आंबेडकरी चळवळीचे नेते मसू जाधव यांच्यावर सशस्त्र हल्ला; 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अंबाजोगाईत एस.एफ.आयकडून जलकुंड स्वच्छता मोहीम राबवली
भारत तोंडे यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवडमाजी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते नियुक्ती व सत्कार



 गोरगरिबांच्या हक्काच्या घरांवर डल्ला मारणार्‍या केज नगरपंचायतीमधील एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा अखेर पर्दाफाश झाला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा तब्बल 4 कोटी 24 लाख 73 हजार 23 रुपयांचा निधी परस्पर इतर खात्यांवर वळवून अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी मिलिंद सावंत यांच्यासह 6 जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाकडून प्राप्त झालेला निधी केवळ पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक होते. मात्र, 20 मे 2021 ते 31 जानेवारी 2022 या कालावधीत तत्कालीन मुख्याधिकारी मिलिंद सावंत यांनी पदाचा दुरुपयोग करत, लेखापाल आणि इतर कर्मचार्‍यांच्या संगनमताने हा कोट्यवधींचा निधी नियबाह्य पद्धतीने लाभार्थ्यांऐवजी इतर खात्यांवर वर्ग केला. चौकशीअंती घोटाळा उघड या प्रकरणाची तक्रार प्राप्त होताच बीड जिल्हाधिकार्‍यांनी गांभीर्याने दखल घेतली होती. उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने सखोल तपासणी करून आपला अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर केला. या अहवालात धक्कादायक बाबी समोर आल्या. कोणते ही शासकीय निर्देश नसताना नियमबाह्यरीत्या रक्कम वर्ग केली गेली. केलेल्या अपहाराचा पुरावा नष्ट करण्यासाठी शासकीय कागदपत्रे आणि दस्तावेज गहाळ करण्यात आले. यांच्यावर झाला गुन्हा दाखल केज नगरपंचायतचे वर्तमान मुख्याधिकारी अजित गणपतराव ढोपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खालील सहा जणांवर गुन्हा नोंदवला आहे.मिलिंद सावंत (तत्कालीन मुख्याधिकारी, सेवानिवृत्त), असद इसाकोद्दीन खतीब (तत्कालीन लेखापाल), लक्ष्मण मारुती जगताप (कंत्राटी लेखापाल सहाय्यक), भास्कर एकनाथ ससाणे (व्हॅल्वमन),भीमराव शामराव मस्के ,बाशेद वलियोद्दीन काझी .  कायदेशीर कारवाई: केज पोलीस ठाण्यात या सहाही आरोपींविरुद्ध गु.र.नं. 236/2026, भारतीय दंड विधान कलम 409 (शासकीय रकमेचा अपहार), 420 ( फसवणूक), 201 (पुरावा नष्ट करणे), 204 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनतेत संताप हक्काच्या छपरासाठी प्रतीक्षा करणार्‍या गरिबांचा पैसा अशा प्रकारे हडप झाल्याने केज शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि त्यांना साथ देणार्‍या कर्मचार्‍यांवर तसेच इतर धोंडावर आता पोलीस काय कठोर कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकट
केज नगरपंचायत मध्ये घरकुल घोटाळ्या संदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली या चौकशी समितीने अहवालामध्ये नीता अंधारे यांना का? कोणाच्या सांगण्या वरून वगळण्यात आलं हे मात्र कळालं नाही गोरगरिबांचे घरकुलाचे पैसे सर्व घरकुल धारकांना मिळावेत किंवा त्यांना घरकुलाच्या लाभार्थी योजनेच्या यादी मधून वगळण्यात यावे. अपहार प्रकरणी आजुन कोणी इतर  अधिकारी कर्मचारी पुढारी असल्याचा संशय आहे, त्यांची देखील कसुन चौकशी करण्यात यावी, मला पंधरा दिवसात मागण्या पुर्ण कण्याच आश्वासन दिल होतं  नगरपंचायतने एक ठोस कागद दिला नाही, लवकरच नगरपंचायत च्या विरोधामध्ये जुना आंदोलन करणार.
भाई मोहन गुंड शेकाप नेते

COMMENTS