Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पालघरमध्ये बनावट जिर्‍याचा कारखाना उघडकीस

पालघर ः पालघर जिल्ह्यातील बनावट जिरे निर्मिती कारखाना पोलिसांनी सील केला आहे. रसायने वापरून तयार केल्या जात असलेल्या बनावट जिर्‍यामुळे नागरिकांचे

आझादी का अमृत महोत्सव निमित्त कायदेविषयक जनजागृती रॅलीचे उद्घाटन
मुख्याध्यापकासह शिक्षक दारु पिऊन शाळेत
इंग्रजी शिक्षणामुळे प्रवरेची जागतिक स्तरावर ओळख

पालघर ः पालघर जिल्ह्यातील बनावट जिरे निर्मिती कारखाना पोलिसांनी सील केला आहे. रसायने वापरून तयार केल्या जात असलेल्या बनावट जिर्‍यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आतापर्यंत बनावट जिर्‍याची किती विक्री झाली आणि किती लोकांच्या आरोग्याशी खेळ झाला, याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. पालघर मधील नंडोरे येथील हा बनावट कारखाना उघडकीस आल्यामुळे त्याचे धागेदोरे थेट भिवंडीपासून गुजरातमधील उंजापर्यंत पोहोचले आहेत. हे बनावट जिरे जिरा राईस करण्यासाठी वापरले जाते. मोठ्या हॉटेलमध्ये पॅरोट कंपनीच्या या जिर्‍याचा वापर केला जातो. बाजारात साडेचारशे रुपये किलो दराने विकल्या जात असलेल्या मूळ जिर्‍यापेक्षा हे बनावट जिरे अडीचशे ते तीनशे रुपये किलो इतक्या कमी दराने विकले जात होते. त्यामुळे व्यावसायिकांची या बनावट जिर्‍यांना पसंती होती

COMMENTS