Homeताज्या बातम्या

वाकडमध्ये ६० वर्षांच्या नराधमाकडून दोन सख्या चिमुकल्या बहिणींवर अत्याचार; पिंपरी चिंचवडमध्ये संतापाची लाट

पिंपरी चिंचवड: पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार व हत्येप्रकरणी ६२ वर्षीय नराधम आरोपी भीमराव कांबळ

गावठी शस्त्र विकणारा टोळी प्रमुख सचिन घोरपडे जेरबंद; वाळूज पोलिसांची मोठी कामगिरी
गोदापात्रात अवैध वाळू उपशावर धडक कारवाई; पाच जणांविरुद्ध गुन्हे, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त
“आमचा एकही आमदार फुटणार नाही!” – खासदार शरद पवारांचा बारामतीत ठाम विश्वास
Lancet Report on sexual violence against children: धक्कादायक! भारतात 18  वर्षांच्या आत 30 टक्के मुलींवर लैंगिक अत्याचार; 13 टक्के मुलांचाही समावेश

पिंपरी चिंचवड: पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार व हत्येप्रकरणी ६२ वर्षीय नराधम आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याची घटना ताजी असतानाच, पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरामध्ये पुन्हा एकदा मन सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे. एका ६० वर्षांच्या नराधमाने शेजारी राहणाऱ्या १० आणि ५ वर्षांच्या दोन सख्या लहान बहिणींवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

घटनेची माहिती मिळताच पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी आणि संतप्त नागरिकांनी नराधमाविरोधात कडक कारवाई आणि गुन्हा दाखल करण्यासाठी वाकड पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. त्यानंतर वाकड पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत ६० वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुली आपल्या आई-वडील आणि आजी-आजोबांसोबत राहतात. शेजारी राहणारा आरोपीदेखील आपल्या पत्नी आणि मुलासोबत राहतो. घटनेच्या दिवशी पीडितेचे कुटुंबीय आणि आरोपीची पत्नी-मुलगा सर्वजण कामासाठी घराबाहेर गेले होते. त्यावेळी १० वर्षांची मुलगी कपडे धुण्यासाठी घराबाहेर आली असता, आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधून आरोपीने तिचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने स्वतःच्या घरात नेले. हा संपूर्ण प्रकार शेजारी राहणाऱ्या एका महिलेने पाहिला आणि तात्काळ पीडितेच्या आईला याची माहिती दिली.

त्यानंतर कुटुंबीयांनी पीडित मुलीकडे विचारपूस केली असता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. आरोपीने मे महिन्यात पहिल्यांदा आणि त्यानंतर असे चार वेळा १० वर्षांच्या मुलीवर तोंड दाबून अत्याचार केले होते. इतकेच नव्हे तर, पाच वर्षांच्या लहान बहिणीवरही या नराधमाने तोंड दाबून अत्याचार केल्याचे पीडितेने सांगितले. या माहितीमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. वाकड पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

COMMENTS