अकोले : तालुक्यातील म्हैसवळण घाट मार्गे धावणारी अकोले-कसारा एसटी बस सेवा गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती. ही बस सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी चंदग

अकोले : तालुक्यातील म्हैसवळण घाट मार्गे धावणारी अकोले-कसारा एसटी बस सेवा गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती. ही बस सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी चंदगिरवाडीचे युवा उद्योजक नामदेव घोरपडे तसेच ऍड.सिद्धेश्वर लांघी तसेच एकदरे चंदगिरवाडीचे ग्रामस्थ यांचा सहकार्याने अकोले आगाराचे आगारप्रमुख सुरेश दराडे यांची भेट घेऊन अकोले–देवठाण–केळी–सांगवी–म्हैसवळण घाट मार्गे कसारा एसटी बस सेवा सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले. या निवेदनाची तत्काळ दखल घेत आगारप्रमुखांनी १७ ऑगस्ट २०२६ पासून बस सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
या बस सेवेमुळे परिसरातील गावांतील नागरिकांना सुलभ, सुरक्षित आणि वेळेवर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून दळणवळणाचा महत्त्वाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.तसेच या बस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास याच मार्गावर आणखी एक बस सुरू करण्याचाही सकारात्मक विचार करण्यात येईल,असे आगारप्रमुख सुरेश दराडे यांनी सांगितले. मुंबईकडे नोकरी,व्यवसाय व इतर कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही बस सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याने परिसरातील नागरिकांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले.
यावेळी सुरेश बोऱ्हाडे, ऍड.सिद्धेश्वर लांघी, नामदेव घोरपडे,चंदगीरवाडीचे सरपंच यशवंता बेंडकोळी,नामदेव साबळे,बाळू आव्हाड तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS