Homeताज्या बातम्या

प्रणव निमसे यांची हवाई दलात निवड

अहिल्यानगर : सोनईजवळील श्रीरामवाडी (चिमटा वस्ती) येथील मुळा कारखान्याच्या सुरक्षा विभागातील कर्मचारी प्रसाद रामनाथ निमसे यांचे चिरंजीव प्रणव निमस

काश्मीरमध्ये दोन स्थलांतरित हिंदू मजुरांची हत्या; नावे विचारून दहशतवाद्यांनी केला गोळीबार, कुलगाम परिसरात शोधमोहीम सुरू
निकषबाह्य इंग्रजी माध्यम शाळांवर कारवाईची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा – डॉ. रॅपनवाड
जगप्रसिद्ध रांजणखळग्यांचा रस्ताच खाचखळग्यात

अहिल्यानगर : सोनईजवळील श्रीरामवाडी (चिमटा वस्ती) येथील मुळा कारखान्याच्या सुरक्षा विभागातील कर्मचारी प्रसाद रामनाथ निमसे यांचे चिरंजीव प्रणव निमसे यांची भारतीय हवाई दलात निवड झाली. देशसेवेत दाखल होण्यापूर्वी प्रणव यांचा सोनई व श्रीरामवाडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला.

सोनई येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस सुरुवात झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समितीचे सभापती सुनील गडाख यांच्या हस्ते प्रणव निमसे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर निमसे वस्ती येथे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभ झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुळा कारखाना राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे सरचिटणीस डी. एम. निमसे यांनी केले. त्यांनी प्रणव यांच्या हवाई दलातील निवडीबाबत माहिती दिली. शिक्षक चंद्रकांत आढाव, शिक्षक सुभाष बेल्हेकर आणि ह.भ.प. गोविंद महाराज निमसे यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रणव यांच्या यशाबद्दल मुळा उद्योग समूहाचे संस्थापक यशवंतराव गडाख, माजी मंत्री शंकरराव गडाख, मुळा कारखान्याचे अध्यक्ष भाऊसाहेब मोटे, उपाध्यक्ष बाळासाहेब दादा पाटील, कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर, सचिव रितेश टेमक, युनियनचे अध्यक्ष अशोकराव पवार आणि सोनई सोसायटीचे संचालक आप्पा महाराज निमसे यांनी अभिनंदन केले. प्राध्यापक सचिन आढाव यांनी आभार मानले.

COMMENTS