Homeताज्या बातम्या

‘दृश्यम’ स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा

बारामती : प्रसिद्ध 'दृश्यम' चित्रपटात ज्याप्रमाणे मृतदेह लपवण्यासाठी पोलिसांच्या नकळत बांधकाम केल्याचे दाखवले होते, तसाच काहीसा अंगावर काटा आणणार

वांबोरीतील विठ्ठल मंदिर वाद चिघळला; कथित भेदभाव व स्वयंघोषित ट्रस्टविरोधात ग्रामस्थांचा धडक मोर्चा
गुरूपौर्णिमेनिमित्त श्री बजरंगबली वेताळ मंदिरात महाआरती व महाप्रसादाचे आयोजन
डिजिटल मीडियावर मुलांचा विळखा: वाढता धोका आणि उपाय
Pune Baramati Wife Giving Anesthetic Medicine and Attempt to Bury her  Husband Alive; आधी गुंगीचं औषध नंतर जबर मारहाण, दृश्यम स्टाईलने जिवंत पतीला पुरण्याचा  प्रयत्न, शुद्धीवर ...

बारामती : प्रसिद्ध ‘दृश्यम’ चित्रपटात ज्याप्रमाणे मृतदेह लपवण्यासाठी पोलिसांच्या नकळत बांधकाम केल्याचे दाखवले होते, तसाच काहीसा अंगावर काटा आणणारा प्रकार बारामतीत समोर आला आहे. एका ३८ वर्षीय महिलेने आपल्या जिवंत पतीला आधी गुंगीचे औषध देऊन अर्धवट बेशुद्ध केले, त्यानंतर बॅटने मारहाण करत त्याला घरातच जिवंत पुरून समाधी देण्याचा प्राणघातक प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण बारामतीत मोठी खळबळ उडाली आहे. हा संपूर्ण संतापजनक प्रकार ३० जुलै २०२६ च्या रात्री साडेअकरा ते १ ऑगस्ट २०२६ च्या सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान घडला. बारामती शहरातील जामदार रोडवरील इंद्रप्रस्थ सोसायटीतील फ्लॅट नंबर ९ मध्ये हा थरार घडला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला शर्मिला प्रवीण जगताप (वय ३८) हिने पती प्रवीण प्रकाश जगताप यांना ठार मारण्याच्या उद्देशाने गुंगीचे औषध दिले. प्रवीण जगताप अर्धवट बेशुद्ध झाल्यानंतर शर्मिलाने त्यांना बॅटने जबर मारहाण केली. यानंतर पतीला कायमचे संपवून पुरावा नष्ट करण्यासाठी तिने घरातील हॉलच्या गॅलरीत विटा-सिमेंटचा एक चौकोनी कट्टा बांधला. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या प्रवीण जगताप यांना त्या कट्ट्यात झोपवून वरून कडप्पा फरशीने तो कट्टा पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हा भयानक प्रकार सुदैवाने वेळेत उघडकीस आल्याने प्रवीण जगताप यांचा जीव वाचला. याप्रकरणी प्रवीण जगताप यांचे वडील प्रकाश जगताप यांनी तात्काळ बारामती शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. वडिलांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी पत्नी शर्मिला जगताप हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीने आपल्या पतीला अशा प्रकारे घरातील गॅलरीतच जिवंत पुरण्याचा कट रचल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा पुढील तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.

COMMENTS