Homeताज्या बातम्या

आधार व्यसनमुक्ती केंद्रात अहिल्याबाई होळकर जयंती व जागतिक तंबाखूमुक्त दिन उत्साहात साजरा

बीड : क्रांतीसुर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित आधार मानसिक (व्यसनमुक्ती केंद्र) येथे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिम

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट-बीड शहरातील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी निधीची मागणी-बीड शहर, ग्रामीण भागातील विविध विकासकामांबाबतही निवेदन सादर
आदिशक्ती संत मुक्ताई पालखी मार्गावरील अस्वच्छता व खड्डे तातडीने दुरुस्त करा!मुख्याधिकारी नगरपरिषद व जिल्हाधिकार्‍यांकडे डॉ. गणेश ढवळे यांची निवेदनाद्वारे मागणी
धुनकवाड-2 ची सुपुत्री अंजली विश्वनाथ भोसले हिचे घवघवीत यश

बीड : क्रांतीसुर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित आधार मानसिक (व्यसनमुक्ती केंद्र) येथे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच जागतिक तंबाखूमुक्त दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर तंबाखू व इतर व्यसनांमुळे होणाऱ्या शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले.

कार्यक्रमाला तेजस घुमरे व संजय भडगळ यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आधार व्यसनमुक्ती केंद्रातील सर्व सदस्य, कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी तंबाखू व इतर घातक व्यसनांपासून दूर राहण्याची सामूहिक शपथ घेऊन समाजात व्यसनमुक्तीचा संदेश दिला.

COMMENTS