Homeताज्या बातम्यामनोरंजन

बिग बींना त्यांची ब्लू टीक पुन्हा मिळाल्यानंतर ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांचे अनोख्या पद्धतीने मानले आभार

‘२१ एप्रिलला अनेक दिग्गज मंडळींचे ब्लू टिक हटवले होते. अनेक राजकीय मंडळींसोबत बॉलिवूड सेलिब्रिटींचे देखील त्यात समावेश होता. बॉलिवूडचे महानायक बि

एलन मस्क ट्विटरचा लोगो बदलणार
एलॉन मस्क पहिल्यांदाच भारत दौर्‍यावर
एलॉन मस्क देणार ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा


‘२१ एप्रिलला अनेक दिग्गज मंडळींचे ब्लू टिक हटवले होते. अनेक राजकीय मंडळींसोबत बॉलिवूड सेलिब्रिटींचे देखील त्यात समावेश होता. बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन ट्वीटरवर बरेच सक्रिय झाले आहेत. बिग बींनी ट्वीटरवर अनेक ट्वीट करत आपली ब्लू टीक परत द्यावी अशी मागणी केली. अखेर बिग बींना त्यांची ब्लू टीक पुन्हा मिळाल्यानंतर ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांचे अनोख्या पद्धतीने आभार मानले आहेत. याआधी ट्विटवरने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचं ब्लू टिक काढलं होतं. पेड सर्व्हिस सुरु झाल्याने बिग बींसोबतच सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि इतर अनेक सेलिब्रिटींचं ब्लू टिक काढण्यात आलं होतं. नुकतंच अमिताभ यांनी पुन्हा एक नवं ट्वीट केलंय. त्यात त्यांच्या ब्लू टीकचा देखील समावेश झाला असून त्यात त्यांनी मिश्किल टोमणा मारत बिग बींनी एलॉन मस्क यांना टोमणा मारला. आज सकाळीच बिग बींनी ट्वीट केले आहे, त्यात बिग बी म्हणतात, “ए, ट्विटर! मी ब्लू टिकसाठी पैसे भरले आणि आता तुम्ही म्हणताय की ज्यांचे १ मिलियन फॉलोअर्स आहेत, त्यांना ब्लू टिक फ्रीमध्ये मिळणार. माझे तर ४८. ४ मिलियन फॉलोअर्स आहेत, आता? खेल खतम, पैसा हजम?” असा मिश्किल टोमणा मारत बिग बींनी एलॉन मस्क यांना टोमणा मारला

COMMENTS