Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भुजबळानंतर आता धनंजय मुंडेना धमकी

फोन करून केली पन्नास लाखाची मागणी

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आणि नुकतेच बंड करून अजित पवार गटासोबत असलेले नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देवून काही ता

चंद्रकांत पाटलांना ही भाषा शोभत नाही – धनंजय मुंडे (Video)
जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले, पंकजांचा धनंजय मुंडेंवर हल्ला (Video)
खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी डॅशबोर्ड विकसित करणार

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आणि नुकतेच बंड करून अजित पवार गटासोबत असलेले नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देवून काही तास उलटत नाही तोच, अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना देखील जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार धनंजय मुंडे हे त्यांच्या परळी येथील राहत्या घरी असतांना त्यांना हा धमकीचा फोन आला आहे. सोमवारी मध्यरात्री 12 वाजता एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मला धनंजय मुंडे यांना मारण्याची सुपारी देण्यात आली आहे. मला पन्नास लाख रुपये द्या, नाहीतर मी धनंजय मुंडे यांना जीवे मारीन, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने दिली आहे. अशीच धमकी छगन भुजबळ यांना देखील देण्यात आली होती. या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली आहे. पोलिसांनी गुन्हा दखल केला असून धमकी देणार्‍याचा शोध घेतला जात आहे. सध्या मुंडे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील सहकार्‍याच्या मोबाईलवर फोन करून धमकी देण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला महाडमधून अटक केली असून दारूच्या नशेत त्याने ही धमकी दिल्याचे तपासात पुढे आले आहे. दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. प्रशांत पाटील असे धमकी देणार्‍याचे नाव असून तो मूळचा कोल्हापूरचा आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अजित गटाचे नेते छगन भुजबळ हे काल पुणे दौर्‍यावर होते. पुण्यात त्याने काही ठिकाणी कार्यक्रम झाल्यावर ते नाशिकला रवाना झाले होते. छगन भुजबळ भुजबळ हे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्‍वासू होते. मात्र, त्यांनी बंडखोरी करत अजित गटात सामील झाले आहे.

COMMENTS