Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अज्ञात वाहनाच्या धडकेत संतकृपा शिक्षण संस्थेचे संस्थापक अशोकराव भावके ठार

कराड / प्रतिनिधी : तालुक्यातील घोगाव येथील संतकृपा शिक्षण संस्था आणि मातोश्री सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अशोकराव जग्गनाथ भावके (वय 52) यांचे मंगळ

माहिती अधिकारी पदी हेमंतकुमार चव्हाण रुजू
सज्जनगडावर लवकरच रोप-वे; 10 कोटींचा निधी मंजूर
पत्रकार मोहन मस्कर-पाटील यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन

कराड / प्रतिनिधी : तालुक्यातील घोगाव येथील संतकृपा शिक्षण संस्था आणि मातोश्री सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अशोकराव जग्गनाथ भावके (वय 52) यांचे मंगळवारी रात्री अपघातात निधन झाले. घोगाव गावाजवळून जाणार्‍या महामार्गावर उभे असताना त्यांना कारने 11 वाजण्याच्या सुमारास धडक दिली. त्यांच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, घोगाव येथील संतकृपा कॉलेज समोर अशोक भावके यांचे मातोश्री हॉटेल आहे. तेथे जेवणाचे ताट तयार करायला सांगून रस्त्यावर फोनवर बोलत आले असता अज्ञात चारचाकीने जोराची धडक दिली. यामध्ये ते डांबरी रस्त्यावर पडले, तेंव्हा हॉटेलमधील लोकांनी त्यांना उपचारासाठी तातडीने कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे आणले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अशोक भावके यांच्या कन्या ऑस्ट्रेलिया येथे असल्याने कन्या आल्यानंतर उद्या गुरूवारी दि. 17 रोजी जन्मगाव घोगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अशोकराव भावके यांनी 1995 ला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून स्व. विलासराव पाटील- उंडाळकर (काका) यांच्या विरोधात शिवेसनेच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. तेथून त्यांच्या राजकारणाची सुरूवात झाली. त्यानंतर त्यांनी संतकृपा शिक्षण संस्था स्थापन केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली होती. मातोश्री सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजूंना मदत केली होती. काही वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त राहून त्यानी पुणे आणि मुंबई येथे बांधकाम व्यवसायात जम बसवला होता. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखले जाते. काल (मंगळवारी) रात्री ते घोगाव येथे आले होते. रस्त्याच्याकडेला उभे राहिले असताना त्यांना कारने धडक दिली त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

COMMENTS