श्रीगोंदा : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम निकालामध्ये श्रीगोंदा य

श्रीगोंदा : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम निकालामध्ये श्रीगोंदा येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाने घवघवीत यश संपादन करत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. विद्यालयातील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय गुण मिळवत शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला.
इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यालयातून १०४ विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी ६९ विद्यार्थिनी पात्र ठरल्या असून ३५ विद्यार्थिनी अपात्र राहिल्या. कोणतीही विद्यार्थिनी गैरहजर नव्हती. विद्यालयाचा निकाल ६६.३३ टक्के लागला.
पाचवीतील गुणवंत विद्यार्थिनींमध्ये भूमी दादा साळुंके हिने २४६ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. सान्वी सुधीर साबळे हिला २३८, सृष्टी काकासाहेब खोसे हिला २२४, श्रावणी उद्धव दिंडे हिला २२२, आरोही शरद तरटे व वैष्णवी रमेश हराळ या दोघींना २२० गुण मिळाले. तसेच अनन्या चंद्रशेखर उदार, वृंदावणी पद्माकर गिरमकर, शुभ्रा हंबीर म्हस्के, प्राची अजित बोरुडे, सलिहा जुबेर पठाण, वेदिका गणेश शेंडगे, अनन्या प्रसाद शिंदे, पायल रावसाहेब दांडेकर, मनस्वी वैभव सोनवणे, राजनंदिनी संदीप राऊत आणि ईश्वरी ज्ञानदेव पोळ यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.
या विद्यार्थिनींना मराठी विषयासाठी राऊत एस. डी., गणितासाठी वाघचौरे एस. व्ही. (विभागप्रमुख), इंग्रजीसाठी घोडे पी. बी. तसेच बुद्धिमत्ता विषयासाठी गारुडकर एस. जी. यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतही विद्यालयाने उल्लेखनीय यश मिळविले. या परीक्षेसाठी ८८ विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी ४५ विद्यार्थिनी पात्र ठरल्या असून ४० अपात्र राहिल्या, तर ३ विद्यार्थिनी गैरहजर होत्या. विद्यालयाचा निकाल ५२.९ टक्के लागला.
आठवीच्या गुणवंत विद्यार्थिनींमध्ये स्वरांजली संदीप भगत हिने २७४ गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. समृद्धी सचिन शेळके हिला २६८, नीता नितीन सप्रे हिला २६४, श्राव्या मच्छिंद्रनाथ लोखंडे हिला २६२, मयुरी लहू गांगर्डे हिला २६० गुण मिळाले. तसेच प्राची महेश खोत, आराध्या अमोल गांगर्डे, भार्गवी योगेश शेलार, समीक्षा संतोष शिंदे, तनिष्का संदीप राऊत, समीक्षा संतोष टकले, स्पंदन विजय वांगणे, परिनीती विक्रम वाघ, आचल निलेश देविकर, क्रांती राजेंद्र राऊत आणि मनस्वी नवनाथ ढवळे यांनीही उल्लेखनीय यश मिळविले.
या विद्यार्थिनींना मराठी विषयासाठी शिंदे के. डी., गणितासाठी खामकर के. जी. (विभागप्रमुख), इंग्रजीसाठी खेडकर डी. सी. तसेच बुद्धिमत्ता विषयासाठी कळसकर एस. एस. यांनी मार्गदर्शन केले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका वर्षा भोईटे, पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे, गुरुकुलप्रमुख किरण शिंदे यांच्यासह संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, विभागीय अधिकारी, सहाय्यक विभागीय अधिकारी, स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, माता-पालक संघ, शिक्षक-पालक संघ तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विद्यार्थिनी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS