जवळे : जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘मिशन आरंभ’ तसेच ‘मंथन’ परीक्षेत जवळे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विशेषतः मंथन परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत तीन विद्यार्थ्यांनी स्थान मिळवत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. इयत्ता चौथीतील प्रणव सचिन घोलप याने २७६ गुण मिळवत राज्य गुणवत्ता यादीत १३ वा क्रमांक पटकावला, तर त्याच इयत्तेतील मैथिली मनोहर बरशिले हिने २५२ गुणांसह २५ वा क्रमांक मिळवला. तसेच इयत्ता तिसरीतील यश संदीप सालके याने २२६ गुण मिळवत राज्य गुणवत्ता यादीत ३९ वा क्रमांक मिळवला. या यशामुळे जवळे शाळेचा शैक्षणिक आलेख उंचावत असल्याचे स्पष्ट झाले असून सहशालेय उपक्रमांमध्येही शाळा अग्रेसर ठरत आहे. शाळेतून घडलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वी होत असल्याने ही शाळा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करणारी संस्था म्हणून ओळखली जाते. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ तसेच विविध स्तरांतून शाळेचे कौतुक होत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात आले.

जवळे : जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘मिशन आरंभ’ तसेच ‘मंथन’ परीक्षेत जवळे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विशेषतः मंथन परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत तीन विद्यार्थ्यांनी स्थान मिळवत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.
इयत्ता चौथीतील प्रणव सचिन घोलप याने २७६ गुण मिळवत राज्य गुणवत्ता यादीत १३ वा क्रमांक पटकावला, तर त्याच इयत्तेतील मैथिली मनोहर बरशिले हिने २५२ गुणांसह २५ वा क्रमांक मिळवला. तसेच इयत्ता तिसरीतील यश संदीप सालके याने २२६ गुण मिळवत राज्य गुणवत्ता यादीत ३९ वा क्रमांक मिळवला.
या यशामुळे जवळे शाळेचा शैक्षणिक आलेख उंचावत असल्याचे स्पष्ट झाले असून सहशालेय उपक्रमांमध्येही शाळा अग्रेसर ठरत आहे. शाळेतून घडलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वी होत असल्याने ही शाळा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करणारी संस्था म्हणून ओळखली जाते.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ तसेच विविध स्तरांतून शाळेचे कौतुक होत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात आले.

COMMENTS