Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

’भीम रत्न’ पुरस्काराने डॉ. भीमराव हत्तीअंबीरे यांचा गौरव

महू (आंबेडकर नगर) : मानवतेचे कैवारी, विश्‍वरत्न बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन जन्मभूमीवर, 14 एप्रिल 2026 रोजी भीमजयंतीचा सोहळा एक

मंथन परीक्षेत श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयाचे यश  
वंदना सोनवणे प्रथम; संगीत खुर्ची स्पर्धेत चमकदार यश
ड्रॉप रो बॉल’ स्पर्धेत चिंचोली विद्यालयातीचे यश 


महू (आंबेडकर नगर) : मानवतेचे कैवारी, विश्‍वरत्न बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन जन्मभूमीवर, 14 एप्रिल 2026 रोजी भीमजयंतीचा सोहळा एका अलौकिक तेजाने उजळून निघाला. मध्य प्रदेश शासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ’शासकीय भीम जयंती समारंभा’त, सामाजिक कार्याचा धगधगता वारसा जपणार्‍या एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा भीम रत्न पुरस्काराने यथोचित गौरव करण्यात आला.
संबोधी अकादमी, महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि समाजसेवेचे व्रत अंगीकारलेले समाजभूषण मा. डॉ. भीमराव हत्तीअंबीरे यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय डॉ. मोहनजी यादव यांच्या शुभहस्ते हा राष्ट्रीय स्तरावरील ’भीम रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा क्षण म्हणजे प्रज्ञा आणि करुणेच्या विचारांचा झालेला सन्मानच होता. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भीम जन्मभूमी मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष, प्रज्ञावंत पूज्य भदत डॉ. धम्मदीप महाथेरो यांनी भूषविले. त्यांच्या पावन उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळीच आध्यात्मिक उंची प्राप्त झाली. पुरस्कार प्रदान करत असताना, मेमोरियल सोसायटीचे सचिव मा. राजेश वानखेडे यांनी मुख्यमंत्री महोदय आणि उपस्थित मान्यवरांना डॉ. हत्तीअंबीरे यांच्या कार्याचा व संबोधी अकादमीच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा परिचय करून दिला.

या ऐतिहासिक प्रसंगी व्यासपीठावर माननीय केंद्रीय मंत्री महोदयांसह अनेक मान्यवर अतिथी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची मशाल घेऊन चालणार्‍या एका खर्‍या अनुयायाचा सन्मान होताना पाहून उपस्थित जनसमुदायामध्ये उत्साहाचे वातावरण होते. हा ’भीम रत्न’ पुरस्कार म्हणजे केवळ एक गौरव नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ’शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या मंत्राचा समाजामध्ये जागर करणार्‍या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाच्या तपस्येची पावती आहे. समाजभूषण डॉ. भीमराव हत्तीअंबीरेजी आणि संबोधी अकादमीचे या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करुन व पुढील वाटचालीस डॉ. अरविंद सावते, शेषराव जल्हारे, भगवान जगताप, भीमराव पतंगे, सिध्दार्थ भराडे, अविनाश मालसमिंदर, शशिकांत हत्तीअंबीरे, गौतम साळवे, दि.फ. लोढे, प्रकाश तांबोळी, गंगाधर परसोडे, बळीराम आरगडे, विश्‍वनाथ डबडे, बी. आर. आव्हाड, नवनाथ जाधव, ज्ञानेश्‍वर हरकळ, दिलीप पाटील, रामप्रसाद घुगे, बद्रीनाथ घुले, बालाजी भुसारे, पंकज नरवाडे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व संबोधी अकादमी परिवाराच्या वतीने सदिच्छा दिल्या.

COMMENTS