Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेरजेच्या राजकारणामुळेच मला मोठे यश : सभापती शिंदे

कर्जत : राजकारण करताना मी नेहमी बेरजेचे राजकारण करतो. राजकीय बेरीज करत असल्यामुळे मला सातत्याने मोठे यश मिळत आहे असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी कर्जत येथे बोलताना केले. कर्जत येथील नगरसेवक प्रसाद ढोकरीकर, प्रवीण ढोकरीकर व त्यांच्या कुटुंबाने सुरू केलेले जॉकी मेंस अंड वुमन्सचे दालन व व्यंकटेश डेव्हलपर्स यांचा शुभारंभ राम शिंदे यांच्या हस्ते झाला यावेळी इरफान मुजावर,जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, नामदेव राऊत प्रवीण घुले काकासाहेब तापकीर,दादासाहेब सोनमाळी अनिल गदादे रोहिणी घुले उषा राऊत काकासाहेब धांडे शिवाजीराव फाळके सतीश पाटील त्यांच्यासह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी व्यापारी उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये राम शिंदे यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की मी सातत्याने बेरजेचं राजकारण करतो. कोणाची सेवा खंडित झाली तरी ती पुन्हा जोडून घेतो. आज प्रसाद ढोकरीकर यांची सेवा काही काळ खंडीत झाली होती मात्र ते पुन्हा आता सक्रिय झाले आहे. त्यांनी आता मागील अनुशेष भरून काढावा आज सर्वच राजकीय पक्षाची नेते मंडळी एकाच व्यासपीठावर आणले आहेत यावरून त्यांची क्षमता देखील लक्षात येते.   शिंदे पुढे म्हणाले की मी सर्वच राजकीय पक्षांना सोबत घेऊन चालवतो असे म्हणत राम शिंदे पुढे म्हणाले की मी सभागृहामध्ये सर्व पक्ष चालवतो माझ्या डाव्या उजव्या बाजूला असणाऱ्यांना योग्य मानसन्मान देतो. आज पर्यंत जी पदे मिळाली ते जनतेच्या व परिसराच्या विकासासाठी काम करण्यासाठी वापरली आहे त्यामुळे शोभेची वस्तू नसून सर्वांगीण विकास करण्यासाठी त्याचा वापर केला आहे. 

विधानपरिषदेसाठी विवेक कोल्हेंचे नाव येताच कोपरगावमध्ये जल्लोष
मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणावेळी विद्यार्थिनींची बॅनरबाजी; राहुरीत तरुणांचा असंतोष ; सुरक्षा भेदत घोषणाबाजी
बलुतेदार संस्था अध्यक्षपदी दिगंबर नाईकनवरे तर उपाध्यक्षपदी बबन पवार

कर्जत : राजकारण करताना मी नेहमी बेरजेचे राजकारण करतो. राजकीय बेरीज करत असल्यामुळे मला सातत्याने मोठे यश मिळत आहे असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी कर्जत येथे बोलताना केले.

कर्जत येथील नगरसेवक प्रसाद ढोकरीकर, प्रवीण ढोकरीकर व त्यांच्या कुटुंबाने सुरू केलेले जॉकी मेंस अंड वुमन्सचे दालन व व्यंकटेश डेव्हलपर्स यांचा शुभारंभ राम शिंदे यांच्या हस्ते झाला यावेळी इरफान मुजावर,जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, नामदेव राऊत प्रवीण घुले काकासाहेब तापकीर,दादासाहेब सोनमाळी अनिल गदादे रोहिणी घुले उषा राऊत काकासाहेब धांडे शिवाजीराव फाळके सतीश पाटील त्यांच्यासह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी व्यापारी उपस्थित होते.

या कार्यक्रमांमध्ये राम शिंदे यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की मी सातत्याने बेरजेचं राजकारण करतो. कोणाची सेवा खंडित झाली तरी ती पुन्हा जोडून घेतो. आज प्रसाद ढोकरीकर यांची सेवा काही काळ खंडीत झाली होती मात्र ते पुन्हा आता सक्रिय झाले आहे. त्यांनी आता मागील अनुशेष भरून काढावा आज सर्वच राजकीय पक्षाची नेते मंडळी एकाच व्यासपीठावर आणले आहेत यावरून त्यांची क्षमता देखील लक्षात येते.

  शिंदे पुढे म्हणाले की मी सर्वच राजकीय पक्षांना सोबत घेऊन चालवतो असे म्हणत राम शिंदे पुढे म्हणाले की मी सभागृहामध्ये सर्व पक्ष चालवतो माझ्या डाव्या उजव्या बाजूला असणाऱ्यांना योग्य मानसन्मान देतो. आज पर्यंत जी पदे मिळाली ते जनतेच्या व परिसराच्या विकासासाठी काम करण्यासाठी वापरली आहे त्यामुळे शोभेची वस्तू नसून सर्वांगीण विकास करण्यासाठी त्याचा वापर केला आहे. 

COMMENTS