Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत बंकटस्वामी महाराज यांच्या फिरत्या नारळी सप्ताहाची थाटात सुरुवात

कथा कीर्तन,भजनाची मेजवानी बीड तालुक्यातील तांदळवाडी गावात भव्य नियोजन

नेकनूर प्रतिनिधी - वारकरी संप्रदायाचे भक्तिसूर्य गुरुनाम गुरु श्री गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या 70 व्या नारळी सप्ताहाची आज बीड तालुक्यातील नेक

माजी मंत्री स्व. कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त विविध सेवांचे लोकार्पण
धरणग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत…  
सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरावर तिघांनी केली तुफान दगडफेक I LOKNews24

नेकनूर प्रतिनिधी – वारकरी संप्रदायाचे भक्तिसूर्य गुरुनाम गुरु श्री गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या 70 व्या नारळी सप्ताहाची आज बीड तालुक्यातील नेकनूर येथे मोठा थाटात सुरुवात झाली. महंत श्री ह भ प गुरुवर्य लक्ष्मण महाराज मेंगडे श्री ह भ प महान हरिहर भारती महाराज श्री ह भ प नाना महाराज कदम श्री ह भ प विष्णुपंत लोंढे गुरुजी श्री ह भ प सुरेश महाराज जाधव श्री ह भ प रंजीत महाराज शिंदे यांच्या हस्ते टाळ,मृदंग,विना, श्रीची पालखी पूजन करून सप्ताहास सुरुवात करण्यात आली. आठ दिवस अखंड हरिनाम सप्ताहामध्ये भागवत कथा,कीर्तन ,भजन व अन्नदान या कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. त्यामुळे सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन तांदळवाडी गावकरी मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे. वारकरी संप्रदायातील महान संत बंकट स्वामी महाराज यांचा वैकुंठवासी सुदाम देव महाराज यांनी सुरू केलेला सतरावा फिरता नारळी सप्ताह यावर्षी मौजे तांदळवाडी घाट येथे संपन्न होत आहे. या सप्ताहात संगीत भागवत कथा श्री ह भ प प्रेमानंद महाराज शास्त्री श्रीक्षेत्र वृंदावन धाम यांची दररोज दुपारी दोन ते पाच या वेळेत सुश्राव्य अशी भागवत कथा होणार आहे .तसेच या सप्ताहात पहिला दिवसाचे कीर्तन पुष्प श्री ह भ प श्री श्री 1008 हरीचैतन्य सरस्वती महाराज बुलढाणा, दिनांक 1एप्रिल 2023 श्री ह भ प शांतिब्रह्म महादेव महाराज तात्या चाकरवाडीकर, दिनांक 2 एप्रिल 2023 श्री ह भ प बाळू महाराज गिरगावकर सेलू, दिनांक 3 एप्रिल 2023 श्री ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा, दिनांक 4 एप्रिल 2023 श्री ह भ प पांडुरंग महाराज गिरी नाशिक, दिनांक 5 एप्रिल 2022 श्री ह भ प उमेश महाराज दशरथे आळंदी देवाची, तर दिनांक 6 एप्रिल 2023 श्री ह भ प भगीरथ महाराज काळे नाशिक, दिनांक 7 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये काल्याचे किर्तन श्री ह भ प महंत लक्ष्मण महाराज मेंगडे मठाधिपती बंकट स्वामी मठ पंढरपूर आळंदी नेकनूर यांचे होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गावकरी मंडळी तांदळवाडीकर यांनी केले आहे. तसेच सप्ताहासाठी येणार्‍या भाविक भक्तांची सर्व निवासाची जेवणाची उत्तम सोय करण्यात आली आहे.

COMMENTS