Homeताज्या बातम्यापुणे

पुण्यात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाई

पुणे : पुणे शहर पोलिसांनी अवैध बांगलादेशी नागरिकांविरुद्धची शोधमोहीम तीव्र केली आहे. फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठ परिसरात पुन्हा एकदा मोठी कारवा

महिला जवानांच्या तत्परतेने प्रवाशाचे प्राण वाचले
चिखलीकरांची तलवार म्यान, अशोकनीतीमुळे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे!गरजणारे बरसले नाहीत, लपून छपून वार करणार्‍यांचे शहरातून पलायन, राजुरकरांच्या वाटेवर काटे पेरणारे तोंडावर आपटले
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या गाडीचा अपघात


पुणे : पुणे शहर पोलिसांनी अवैध बांगलादेशी नागरिकांविरुद्धची शोधमोहीम तीव्र केली आहे. फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठ परिसरात पुन्हा एकदा मोठी कारवाई करत अवैधरीत्या वास्तव्य करणार्‍या 5 बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त ऋषीकेश रावले यांनी पदभार स्वीकारल्यापासून गेल्या 11 महिन्यांत एकूण 94 बांगलादेशी नागरिकांना विविध कारवायांमध्ये अटक करण्यात आली आहे.फरासखाना पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत भसमे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने 11 मे रोजी रात्री 1 ते सकाळी 9 या वेळेत बुधवार पेठ येथील रेड लाईट एरियात ’कोम्बिंग ऑपरेशन’ राबवले.

COMMENTS