Homeताज्या बातम्या

मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता; श्रीगोंदा जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय

श्रीगोंदा: कर्जत पोलीस ठाण्यात १६ फेब्रुवारी २०२३ रोजी दाखल झालेल्या ॲट्रॉसिटी, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या गुन्ह्यातील आरोपींची श्री

कायद्याचा दणका: किनवटच्या वेशीवर ’दहशती’चा माज उतरला; हातात तलवार घेणारा हद्दपार आरोपी जेरबंद
’आनंदाचे डोही, आनंद तरंग’ : स्वरांतून अवतरला विठ्ठलभक्तीचा उत्सव; नांदेडात भक्तिसंगीत सोहळा उत्साहात
नांदेड जि.प. शिक्षण विभागाच्या गैरकारभाराची लक्तरे वेशीवर; मयत शिक्षक सुनील मोरे यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे शिक्षक संघटनांचा एल्गार

श्रीगोंदा: कर्जत पोलीस ठाण्यात १६ फेब्रुवारी २०२३ रोजी दाखल झालेल्या ॲट्रॉसिटी, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या गुन्ह्यातील आरोपींची श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून फिर्यादीस जातिवाचक शिवीगाळ करून तलवारीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली तसेच मारहाण केल्याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाची सुनावणी श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश एम. एम. राव यांच्या न्यायालयासमोर झाली. खटल्यादरम्यान दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकण्यात आले. साक्षीदारांचे जबाब व उपलब्ध पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने पुराव्याअभावी आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिला.

या प्रकरणात आरोपींच्या वतीने ऍड. दीपाली नंदकुमार बोरुडे यांनी प्रभावी बाजू मांडली. विविध साक्षीपुरावे व कायदेशीर मुद्द्यांवर युक्तिवाद करत त्यांनी आरोपींची बाजू न्यायालयासमोर भक्कमपणे मांडली. त्यानंतर न्यायालयाने सर्व पुराव्यांचे कायदेशीर परीक्षण करून आरोपींची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.

COMMENTS