Homeताज्या बातम्यादेश

रोहित शर्माची अमेरिकेत क्रिकेट अकॅडमी

भारताचा कर्णधार रोहित शर्मा लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याचे चाहते केवळ भारतातच नाही, तर जगभरात दिसून येतात. नुकताच रोहितने भारतीय संघासह

नेमबाजीत साईराज काटेला दोन पदके
IPL 2023 मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंगला सुपरस्टार रजनीकांतने केला फोन
पराभवानंतर शाहीन आफ्रीदीबाबत पाकिस्तानचे मोठे विधान.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याचे चाहते केवळ भारतातच नाही, तर जगभरात दिसून येतात. नुकताच रोहितने भारतीय संघासह वेस्ट इंडिज दौराही केला. याच दौऱ्यातील वनडे मालिका संपल्यानंतर तो अमेरिकेतच थांबला. यामागील कारण म्हणजे रोहितने अमेरिकेत त्याची क्रिकेट अकादमी सुरु केली आहे. ‘क्रिककिंगडम बाय रोहित शर्मा ही मोठ्या क्रिकेट अकादमींपैकी एक आहे. आता हीच अकादमी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे सुरू झाली आहे. क्रिककिंगडम’ ही भारतातील लोकप्रिय अकादमी आहे. पण आता रोहित आणि त्याच्या बिझनेस पार्टनर्सने भारताबाहेरही हा व्यावसाय नेण्यासाठी काम करत आहेत.. दरम्यान, जेव्हा रोहित या अकादमीच्या लाँचसाठी कॅलिफोर्नियाला पोहोचला, तेव्हा त्याचे अमेरिकेतील क्रिकेट चाहत्यांकडून स्वागत करण्यात आले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय रोहितचा बिझिनेस पार्टनर चेतन सुर्यवंशी याने सोशल मीडियावर रोहित शर्मा आणि अकादमीच्या अन्य पार्टनर्सबरोबर फोटो शेअर केला आहे. या फोटोसह त्याने अकादमीच्या उद्घटनाबद्दल सांगितले. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की ‘अमेरिकेतील क्रिककिंगडम क्रिकेट ऍकेडमी बाय रोहित शर्माचे प्री लाँच सेलिब्रेशन.दरम्यान, रोहित नुकताच वेस्ट इंडिज दौऱ्यात खेळला. तो वेस्ट इंडिज विरुद्ध 2 कसोटी सामने आणि 1 वनडे सामना खेळला. त्याला वनडे मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली होती. तसेच सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या टी20 मालिकेसाठी मात्र, त्याला भारतीय संघात संधी देण्यात आलेली नाही. रोहितने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली होती. त्याने पहिल्या कसोटीत 103 धावांची शतकी खेळी केली होती. तसेच दुसऱ्या कसोटीत 80 आणि 57 धावांची खेळी केलेली. याशिवाय तो वनडे मालिकेतील खेळलेल्या पहिल्या सामन्यात 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. त्यावेळी त्याने नाबाद 12 धावा केल्या होत्या. आता रोहित 30 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया चषकात खेळताना दिसणार आहे.

COMMENTS