Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

26 आठवड्याच्या भू्रणाच्या गर्भपातास परवानगी

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई- मुंबई उच्च न्यायालयाने 26 आठवड्यांचा गर्भपात करण्यास परवानगी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाल

ग्राहकांना मोठा धक्का, रिचार्ज प्लान महागणार !
संसदेवरील चढाई आणि…. 
कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे-शिंदे गट एकत्र

मुंबई- मुंबई उच्च न्यायालयाने 26 आठवड्यांचा गर्भपात करण्यास परवानगी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणााची सुनावणी करताना महिलेला तिच्या 26 आठवड्यांचा  गर्भपात करण्यास परवानगी दिली आहे. महिलेने न्यायालयाला माहिती दिली होती की, भ्रूण आजाराने ग्रस्त आहे. या पार्श्‍वभूमीवर महिलेने गर्भपाताची परवानगी मागितली होती.
एका विवाहित महिलेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत सांगितले की, तिच्या भ्रूणाला मायक्रोसेफली नावाच्या आजाराची लक्षणे आहेत. मायक्रोसेफली आजारामध्ये भ्रूणाच्या डोक्याचा पूर्णपणे विकास होत नाही. यामुळे गर्भाचे डोके इतर सर्वसाधारण गर्भापेक्षा लहान आकाराचे असते. त्यामुळे महिलेने बॉम्बे हायकोर्टाकडे गर्भपाताची परवानगी मागितली होती. न्यायमूर्ती रमेश धानुका आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने महिलेनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देत गर्भपाताला परवानगी देण्याचा आदेश दिला आहे. गर्भधारणेच्या 24 आठवड्यांनंतर महिलेने गर्भपात करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. भारतात गर्भ 24 आठवड्यांचा झाल्यानंतर गर्भपात करण्यास परवानगी नाही. असे केल्यास हा गुन्हा ठरतो. त्यामुळे महिलेने गर्भापाताला कायदेशीर परवानगी मिळावी यासाठी याचिका दाखल केली होती. महिलेने न्यायालयात याचिका दाखल करताना वैद्यकीय अहवाल सादर केला होता. या अहवालांमध्ये डायग्नोस्टिक सेंटर आणि जसलोक हॉस्पिटलमधील वैद्यकीय तपासणीचा समावेश होता. या अहवालांमध्ये म्हटले आहे की, गर्भामध्ये मायक्रोसेफलीआजाची लक्षणे आहेत, यामुळे भ्रूणाला न्यूरोलॉजिकल विकासासंबंधित अनेक विकृती होऊ शकतात. महिलेच्या वतीने भ्रूणाच्या परिस्थितीबाबत वैद्यकीय अहवाल सादर केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने गर्भपाताला परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात जे जे रुग्णालयात वैद्यकीय मंडळाची नियुक्ती केली होती. न्यायालयाने नियुक्त मंडळाने तपासानंतर 26 मे रोजी न्यायालयाला दिलेल्या अहवालात माहिती देत, हे प्रकरण गर्भपातासाठी योग्य असल्याचे सांगितले. नियुक्त केलेल्या वैद्यकीय मंडळाच्या अहवालानंतर उच्च न्यायालयाने गर्भपातासंबंधित मोठा निर्णय दिला. या प्रकरणात, उच्च न्यायालयाने सप्टेंबर 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा हवाला दिला. एका निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, प्रत्येक गर्भवती महिलेला जन्म देण्याच्या बाबतीत गर्भपात निवडण्याचा अधिकार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गर्भपाताला परवानगी देत सांगितले की, जे जे रुग्णालयाच्या वैद्यकीय मंडळाचा अहवाल आणि परिस्थिती पाहता आम्ही हे प्रकरण गर्भपातासाठी योग्य असल्याचे मानतो. याचिकाकर्त्याला गर्भपाताला परवानगी देण्यात येत आहे. महिलेच्या वकिलाच्या वतीने जे. जे. रुग्णालयातच गर्भपात करण्याची मागणीही मान्य करण्यात आली आहे.

COMMENTS