Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साहेब टाळा कधी उघडणार …?

वडूज : तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेला कुलूप लावून गायब झालेले कर्मचारी अन् त्यांच्या प्रतीक्षेत असलेले नागरिक. खटाव तहसीलच्या पुरवठा शाखेला टा

फलटण तालुक्यात वाघाटी मांजराचा वावर; मादीसह तीन पिल्लांचे दर्शन
औरंगाबादेत 15 वर्षाच्या मुलाचा 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार |LokNews24
सातारा जिल्ह्यात पाणी टंचाई; प्रशासनाकडून टँकर सुरू

खटाव तहसीलच्या पुरवठा शाखेला टाळा लावून कर्मचारी गायब : मनसेचे सूरज लोहार करणार आंदोलन
वडूज / प्रतिनिधी : खटाव तहसील कार्यालय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिले आहे. काल परवा झालेल्या लाचलुचपत विभागाच्या कारवाईने तर महसूलची अब्रू वेशीला टांगली असल्याचे चित्र स्पष्ट झाले असताना आता खटाव तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेला कुलूप लावल्याचे दिसताच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत काही नागरिकांनी मनसेचे राज्य चिटणीस सूरज लोहार यांच्याशी संपर्क साधला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडूज हे तालुक्याचे मुख्यालय असूनही याठिकाणी शासकीय, निमशासकीय, शाळा, महाविद्यालय असल्याने याठिकाणी येणार्‍या नागरिकांची संख्या अधिक आहे. विशेषतः महसूल विभागात कामासाठी येणार्‍या ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी ये-जा असते. आज याठिकाणी असणार्‍या पुरवठा शाखेच्या ऑनलाईन विभागला अक्षरशः कुलूप लावण्यात आले होते. तालुक्याचा विस्तार मोठा असल्याने ग्रामीण भागातून लांब पल्ल्याहून येणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना याठिकाणी कामासाठी आल्यानंतर हताश होऊन माघारी जावे लागले.
आज याठिकाणी पुरवठा शाखेला कुलूप बघून अनेक नागरिकांना आपले काम न करताच मागे जावे लागल्याने अनेकांनी वडूजच्या तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेच्या कामाकजाबद्दल नाराजी व्यक्त केली. याबाबत काही सुज्ञ नागरिकांनी येथील मनसेचे राज्य चिटणीस सूरज लोहार यांच्या कार्यालयात आपला मोर्चा वळविला. अन महसूलच्या या अनगोंदी कारभाराचा पाडा वाचला.
यानंतर सूरज लोहार यांनी स्वतः याठिकाणी जाऊन पाहणी केली असता तहसील कार्यालयात असणार्‍या पुरवठा शाखेला कुलूप असल्याचे दिसून आले. तर याठिकाणी कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी याठिकाणी सर्वसामान्य जनतेची कामे होत नसल्याचे सांगितले. दिवसभर याठिकाणी थांबवून उद्या या परवा या अशी उत्तरे देत असल्याचे सांगितले.
यानंतर सूरज लोहार यांनी पत्रकारांना याबाबत माहिती देऊन लवकरच खटाव तहसील कार्यालयच्या कारभाराबाबत तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी यांना भेटून खटाव तहसीलचा कारभार सुधारण्यात यावा याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर संजय गांधी योजनेत कामानिमित्त येणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना अरेरावी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

COMMENTS