Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निळवंडेतून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी

अहमदनगर/प्रतिनिधी ः निळवंडे धरण लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांसाठी आजचा दिवस आनंदाचा व ऐतिहासिक आहे. निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधीची

शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळे यांची निवड
इनरव्हील क्लबकडून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
धाडगेवाडी शाळेतील स्नेहसंमेलन उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी ः निळवंडे धरण लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांसाठी आजचा दिवस आनंदाचा व ऐतिहासिक आहे. निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. हे शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असा  विश्‍वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. धरणामुळे विस्थापित झालेल्या शेतकर्‍यांना मोबदल्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. अशी ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरणार्‍या निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची प्रथम चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज निब्रळ येथे पार पडली. कार्यक्रमाच्या प्रारंभी  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते जलपूजन करून निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात आली.
 या शासनाने पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत शेतकरी, कष्टकरी यांच्या हिताचे निर्णय घेतला असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शासनाने अकरा महिन्याच्या कालावधीत 29 प्रकल्पांना तात्काळ सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील 6 लाख 8 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून शासन काम करत आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्याने शेतकर्‍यांना नमो महासन्मान योजना सुरू केली आहे. यात शेतकर्‍यांना केंद्राप्रमाणे 6 हजारांची मदत दिली जाणार आहे.  एक रूपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकर्‍यांना निकषाच्या दुप्पटीने मदत देण्यात आली. राज्याने 25 लाख हेक्टर क्षेत्रावर सेंद्रीय शेतीचे उद्दिष्ट ठेवले असून जलयुक्त शिवार योजना टप्पा 2 सुरू करण्यात आला आहे. ’निळवंडे च्या पाण्यासाठी शेतकर्‍यांना  53 वर्ष वाट पाहावी लागली. आता ही प्रतिक्षा फक्त या शासनाने घेतलेल्या कल्याणकारी निर्णयामुळे संपली  आहे. असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

’निळवंडे’ कालव्यांच्या कामांना गती देणार : फडणवीस – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निळवंडे प्रकल्पाचा इतिहास मोठा आहे. सुरूवातीला 8 कोटींचा रुपयांचा असलेला हा प्रकल्प आज 5 हजार 177 कोटी रुपयांचा  झाला आहे. 2017 मध्ये या प्रकल्पास अडीच हजार कोटी रुपयांची  सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आणि या प्रकल्पास गती मिळाली. धरणाच्या सुरूवातीच्या 22 किलोमीटरला स्थानिक शेतकरी व आदिवासींना विश्‍वासात घेऊन गती देण्यात आली. यावर्षीच्या बजेट मध्ये गोसीखुर्द नंतर सर्वाधिक निधी  निळवंडे धरणासाठी देण्यात आला आहे .त्यामुळे या धरण कालव्यांचे काम कोठेही थांबणार नाही. धरणाच्या  उजव्या कालव्याचे काम  पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. अशी ग्वाही  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून 2014 ते 2019 या काळात नगर जिल्ह्यातील 2 लाख,98 हजार हेक्टर शेती संरक्षित सिंचनाखाली आली असल्याची माहिती ही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

COMMENTS