Homeताज्या बातम्याविदेश

चीनमध्ये रुग्णालयाला भीषण आग

चीन प्रतिनिधी - चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चीनची राजधानी असलेल्या बीजिंगमधील एका रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा दुर्दै

नयनतारा-विग्नेश अडकणार लग्न बंधनात ! | LOKNews24
 चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बद्दल बोलण्याची रोहित पवार यांची पात्रता नाही – धर्मपाल मेश्राम 
अॅड प्रभाकर खराटे यांची जिल्हा कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड

चीन प्रतिनिधी – चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चीनची राजधानी असलेल्या बीजिंगमधील एका रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 71 जणांना वाचवण्यात यश आले आहे. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, बीजिंगमधील चांगफेंग हॉस्पिटलमध्ये हा अपघात झाला. रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी 21 लोकांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून, घटनेचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, बीजिंगच्या फेंगताई जिल्ह्यातील एका रुग्णालयाच्या इमारतीला दुपारी 12:57 वाजता आग लागली. त्याचवेळी चीनमध्ये आग लागण्याची आणखी एक घटना समोर आली आहे. पूर्वेकडील झेजियांग प्रांतातील जिन्हुआ शहरातील वुई काउंटीमधील कारखान्याला लागलेल्या आगीमध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला. स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:04 वाजता ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस अधिकारी आणि आपत्कालीन वैद्यकीय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

COMMENTS