Aaurangabad : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी लोकार्पण

Homeताज्या बातम्या

Aaurangabad : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी लोकार्पण

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील संतपीठाचे लोकार्पण आणि अभ्यासक्रमांची सुरुवात मराठवाडा मुक्ती  संग्राम दिनापासून होत आहे. मुख्यमंत्री उद

बीडमध्ये सामाजिक संस्थांची बैठक संपन्न
सिल्लोड ,शहरातील नगर परिषद प्रशालेच्या मैदानाचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते भूमीपूजन
आ. जयंत पाटील यांनी एसटीची बस चालविल्याप्रकरणी आगार प्रमुखासह चालकावर कारवाईची भाजपाची मागणी; माझ्यावर खुशाल गुन्हा दाखल करा : आ. जयंत पाटलांचे प्रत्युत्तर

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील संतपीठाचे लोकार्पण आणि अभ्यासक्रमांची सुरुवात मराठवाडा मुक्ती  संग्राम दिनापासून होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते संतपीठाचे लोकार्पण होईल, असे  रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भूमरे म्हणाले. मंत्री भूमरे आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज पैठण येथील संतपीठ प्रशासकीय इमारतीची पाहणी केली.
                सध्या सुरू असलेल्या विविध कामांची, इमारतीत असलेल्या सर्व सोयी सुविधांची पाहणी करत अधिकारी यांनी सूचविलेल्या अडचणी समजून घेतल्या.त्या तत्काळ सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देशही दिले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ.ज्योती सूर्यवंशी, समन्वयक प्रवीण वक्ते उपस्थित होते.

COMMENTS