Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकाच आठवड्यात चार दुचाकी लंपास

देवळाली प्रवरा /प्रतिनिधीः राहुरी फॅक्टरी येथे एका आठवड्यात चार मोटारसायकली चोरी गेल्या आहेत. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करुनही मोटारसायकल चोर मात

मेंदूमध्ये रुतलेला दगड शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात यश
देवळाली प्रवरात 2 लाख 42 हजारांची गावठी दारू जप्त
जीएम औषधांवर बंदी का नाही? ; शेतकरी नेते घनवट यांचा सवाल, मंत्री जावडेकरांवर केली टीका

देवळाली प्रवरा /प्रतिनिधीः राहुरी फॅक्टरी येथे एका आठवड्यात चार मोटारसायकली चोरी गेल्या आहेत. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करुनही मोटारसायकल चोर मात्र पोलिसांना सापडेना. दुचाकी चोरी जाण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिक व व्यापारी वर्गातून संताप व्यक्त होत असून, दुचाकी चोरटयांनी पोलिसांसमोर आव्हानच उभे केल्याचे दिसून येत आहे.

दुचाकी चोरांचा पोलिसांनी शोध घेण्याऐवजी झिरो पोलिस शोध घेत असून,नागरिकांना धीर देण्याचे काम ही झिरो पोलिसच करीत आहे. माझ्याच हातात मोटारसायकल चोराचा शोध घेण्याचे काम आहे. मीच तुमच्या मोटारसायकल चोरांचा शोध लावू शकतो. असे तो तक्रारदार नागरीकांना सांगून तक्रारदार यांना पोलिस ठाण्यात जाण्यास मज्जाव करीत असल्याच्या तक्रारी पुढे आता आल्या आहेत. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनूसार, राहुरी फॅक्टरी येथील शामराव खडके यांची बजाज प्लॅटिना, किशोर देसरडा यांची डिस्कव्हर, विशाल बोर्डे यांची पॅशन तर स्वराज विष्णू गीते यांची बुलेट अशा चार दुचाकी एकाच आठवड्यात अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून तातडीने चोरांचा शोध लावावा.अन्यथा अहमदनगर-मनमाड रोडवर आंदोलन छेडु असा इशारा पोलिस निरीक्षक जाधव यांना दिलेल्या निवेदनात राहुरी फँक्टरी येथिल व्यापारी संघटनेने दिला आहे.

राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांची भेट घेवून राहुरी फँक्टरी येथिल व्यापारी संघटनेने तक्रारीचा पाढा वाचला. मोटारसायकल चोरांचा तातडीने शोध लावावा.अन्यथा आंदोलन छेडु असा इशारा व्यापारी संघटनेने दिला. यावेळी साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विष्णू गीते, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, राहुरी अर्बन क्रेडिट सोसायटीचे चेअरमन प्रशांत काळे, आरपीआय तालुकाध्यक्ष विलास साळवे, प्रसाद लोखंडे, बबलू गाडे, संभाजी औटी, शामकांत खडके, विशाल बोर्डे आदिंसह व्यापारी व नागरिक उपस्थित होते.

COMMENTS