Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दरीत कोसळलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई/प्रतिनिधी ः दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ’वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान एक कर्मचारी पन्हाळा गडाच्या तटबंदीवरुन

… तर याद राखा… तालिबानचा अमेरिकेला कडक शब्दात इशारा…
राम चरणच्या मुलीसाठी अंबानी कुटुंबाने दिला 1 कोटींचा सोन्याचा पाळणा!
अक्षय कुमारला मिळालं भारतीय नागरिकत्व

मुंबई/प्रतिनिधी ः दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ’वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान एक कर्मचारी पन्हाळा गडाच्या तटबंदीवरुन कोसळला होता. या कर्मचार्‍याचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागेश खोबरे (वय 19) असे मृत्यू झालेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे.
गेल्या 19 मार्चरोजी रात्री साडे नऊवाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. चित्रीकरणादरम्यान, मोबाईलवर बोलत असतानाच नागेशचा तोल गेला आणि तो तब्बल 100 फूट खोल तटबंदीवरुन कोसळला. रात्रीच्या अंधारात नागेशला तटबंदीचा अंदाज आला नाही. दरीत कोसळल्याने नागेश गंभीर जखमी झाला होता. दुर्घटनेनंतर नागेशला तातडीने कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 10 दिवसांपासून नागेशवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आज पहाटे त्याचा मृत्यू झाला. नागेशच्या जाण्यामुळे चित्रपटाच्या सर्व टीमला मोठा धक्का बसला आहे. ’वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातील घोड्यांची निगा राखण्याचे काम नागेश करत होता. 

COMMENTS