Homeताज्या बातम्यादेश

द्वेषाच्या बाजारात प्रेम वाटण्याचा प्रयत्न

बर्फवृष्टीत राहुल गांधींचे वादळी भाषण

श्रीनगर/वृत्तसंस्था ः मी हिंसा बघितली आहे, मी माझ्या आजीला, वडिलांना गमावले आहे. त्यामुळे हिंसा आणि द्वेषाच्या राजकारणातून दूर जात देशभर भारत जोड

धनलक्ष्मी शाळेत उपक्रमातून साकारत आहे लोकशाही शिक्षण
दादा चौधरी मराठी शाळेत धमाल उन्हाळी छंद वर्गाचा समारोप उत्साहात संपन्न
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोपपत्र दाखल

श्रीनगर/वृत्तसंस्था ः मी हिंसा बघितली आहे, मी माझ्या आजीला, वडिलांना गमावले आहे. त्यामुळे हिंसा आणि द्वेषाच्या राजकारणातून दूर जात देशभर भारत जोडो यात्रा प्रेम वाटत राहिली. भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक मला शिव्या घालतात, त्यांना मी धन्यवाद देतो. कारण द्वेषाच्या बाजारात मी प्रेम वाटण्याचा प्रयत्न करत असल्याचे काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी सांगितले. जोरदार बर्फवृष्टी सुरू असतांना देखील राहुल गांधी यांनी वादळी भाषण करत, भारत जोडो यात्रेचा समारोप केला.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा काल सोमवारी श्रीनगरमध्ये समारोप झाला. काँग्रेसने यावेळी श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर जाहीर सभा बोलावली होती. यावेळी राहुल गांधी समारोपाचे भाषण करताना म्हणाले की, तुम्हाला जगायचे असेल तर न घाबरता जगावे लागेल हे मी गांधीजींकडून शिकलो आहे. मी चार दिवस इथे पायी फिरलो. माझ्या टी-शर्टचा रंग बदलून लाल होईल असे म्हटले गेले. पण मला जे वाटले तेच झाले. जम्मू-काश्मीरच्या लोकांनी मला हँड ग्रेनेड नाही तर प्रेम आणि आपलेपण दिले, प्रेमाने माझे स्वागत केले. राहुल गांधी म्हणाले, माझ्या आधी प्रियांका गांधी मंचावर आल्या होत्या. त्या जे बोलल्या ते ऐकूण माझ्या डोळ्यात पाणी आले. प्रियांका गांधी यांनी जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले की, काश्मीरला पोहोचण्यापूर्वी राहुल गांधींनी मला आणि सोनिया गांधींना फोन करून सांगितले होते की, त्यांना विचित्र वाटत आहे. त्यांना त्यांच्या घरी आल्यासारखे वाटत आहे. जेव्हा ते काश्मीरमधील लोकांना भेटतात तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू असतात. राहुल गांधी म्हणाले, मी लहानपणापासून सरकारी घरात राहिलो आहे, माझ्याकडे घर कधीच नव्हते. माझ्यासाठी घर म्हणजे वास्तू नाही, तर ती जीवन जगण्याची पद्धत आहे. यालाच तुम्ही काश्मिरियत म्हणता, मी त्याला घर मानतो. ते म्हणाले, काश्मिरियत म्हणजे नेमक काय आहे? एकीकडे ही शिवजींची विचारसरणी आहे, आणखी खोलात गेलो तर त्याला शून्यता म्हणता येईल. स्वतःवर, तुमच्या अहंकारावर, तुमच्या विचारांवर आक्रमण करणे. दुसरीकडे इस्लाममध्ये याला फना म्हणतात. विचार एकच आहे. इस्लाममध्येही फना म्हणजे स्वतःवर आक्रमण, तुमच्या विचारावर आक्रमण. या पृथ्वीवर दोन विचारधारा आहेत, त्यांच्यात वर्षानुवर्षे नाते आहे. यालाच आपण काश्मिरियत म्हणतो.

देशाचे विभाजन करणार्‍याविरोधात उभे राहण्याची गरज – सध्याचा काळ हा विचारधारेचा असून, काही विचारधारा देशाचे विभाजन करू पाहत आहे. त्यामुळे देशाचे विभाजन करु पाहणार्‍या विचारसरणीच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. पण द्वेषाने नाही तर प्रेमाने उभे रहा. आपण त्या विचारधारेचा केवळ पराभव करणार नाही, त्यांच्या हृदयातून द्वेषपूर्ण विचारधारा काढून टाकू, असे आवाहन देखील राहुल गांधी यांनी केले.  जे लोक हिंसा घडवतात, त्यांना त्याचे दुःख कळत नाही, मला त्या वेदना माहीत आहेत. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांचे काय झाले हे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना समजू शकत नाही, मी समजू शकतो असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.  

COMMENTS