Homeताज्या बातम्यादेश

संसदेचे कामकाज 3 एप्रिलपर्यंत तहकूब  

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः काँगे्रस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँगे्रसकडून संसदेमध्ये दररोज आंदोलन करण्यात येत असल्यमुळे संसदेच

केज तालुक्यातील येवता येथे बजरंग बप्पा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त जय्यत तयारी
नदीपात्रात अंघोळीसाठी उतरलेल्या मामा-भाच्याचा बुडून मृत्यू
LOK News 24 I अल्पवयीन मुलीवर सलग दोन आठवडे बलात्कार

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः काँगे्रस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँगे्रसकडून संसदेमध्ये दररोज आंदोलन करण्यात येत असल्यमुळे संसदेचे कामकाज सुरळीत सुरू नाही. अखेर संसदीय अधिवेशन 3 एप्रिलपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 12 व्या दिवशी कामकाज सुरू होताच संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले. यापूर्वी राज्यसभा दुपारी 2 वाजेपर्यंत आणि लोकसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते, मात्र नंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज 3 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आले. लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांनी ’लोकशाही वाचवा’चे पोस्टर दाखवले आणि अध्यक्षांसमोर काळे कपडे फडकावले होते. काँग्रेसने संसदेच्या सीपीपी हॉलमध्ये दोन्ही सभागृहांतील आपल्या खासदारांची बैठक बोलावली आहे. त्यात सहभागी होण्यासाठी राहुल गांधी संसदेत पोहोचले. येथे अर्धा तास थांबून ते सोनिया गांधी यांच्यासोबत कारमधून निघाले. याआधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेत त्यांच्या चेंबरमध्ये विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. आजही काँग्रेसचे नेते काळे कपडे घालून संसदेत पोहोचले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, पंतप्रधान मोदी स्वतः भ्रष्ट आहेत. ज्यांनी हा देश लुटला त्यांना ते काहीच बोलत नाहीत. अशा लोकांवर कारवाई होत नाही असा सवाल ही त्यांनी यावेळी केला.

COMMENTS