Homeताज्या बातम्याराजकारण

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाचा संघर्ष पेटला !

दिलेला शब्द पाळणे, सर्वात मोठी शक्ती : शिवकुमारनवी दिल्ली : कर्नाटकातील सत्तासंघर्षाने उंच टोक गाठले असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीके शिवकु

कराडला रिक्षा व्यावसायिकांचे आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन
पक्षासाठी कायपण ! भाजप आमदार थेट स्ट्रेचरवरुन विधानभवनात | LOK News 24
मालेगाव स्फोट प्रकरणाला नवे वळण; चारही आरोपींची दोषारोप पत्रातून मुक्तता
कर्नाटकात मुख्यमंत्री Karnataka Chief Minister - Tarun Bharat Nagpur

दिलेला शब्द पाळणे, सर्वात मोठी शक्ती : शिवकुमार
नवी दिल्ली : कर्नाटकातील सत्तासंघर्षाने उंच टोक गाठले असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यातील मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेला सुप्त संघर्ष रौद्र रूप धारण करतांना दिसून येत आहे. कर्नाटकात काँगे्रसची सत्ता आल्यानंतर तत्कालीन काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. मात्र त्यावेळी काँगे्रस पक्षश्रेष्ठींनी मध्यस्थी करून अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठेवल्याची चर्चा सुरू असून त्याचमुळे डीके शिवकुमार यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे.
याच सत्तासंघर्षावर बोलतांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, हायकमांडने दिल्लीत मला आणि शिवकुमार यांनी चर्चेसाठी बोलावल्यास आपण तिथे जाऊ. मात्र याचवेळी शिवकुमार यांनी एक्सवर एक पोस्ट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद विभागून देण्याच्या अटकळीला गेल्या काही दिवसांपासून वेग आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे सुतोवाच केले होते, त्याचवेळी मुख्यमंत्रीपदावर मात्र तेच राहतील, असेही ते म्हणाले. दुसर्‍या बाजूला उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे समर्थक सिद्धरामय्या यांना बाजूला करण्यासाठी कर्नाटक आणि दिल्लीत लॉबिंग करत आहेत. या सर्व गोंधळात उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले.

..तर कर्नाटकात ऑपरेशन लोटस ?
कर्नाटकात भाजप सध्या ऑपरेशन लोटस राबविण्यात सक्रिय नसले तरी, डीके शिवकुमार यांची नाराजी तीव्र झाल्यास आणि पक्षाने मुख्यमंत्रीपद न दिल्यास कर्नाटकात भाजपच्या मदतीने सत्ताबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवकुमार यांनी एक्सवर पोस्ट करतांना एक फोटो जोडला आहे. तसेच कन्नडमध्ये लिहिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, दिलेला शब्द पाळणे ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे. त्यांचा हा इशारा थेट काँगे्रस पक्षश्रेष्ठींना असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे डीके शिवकुमार यांना जर मुख्यमंत्रीपद मिळाले नाही तर, कर्नाटकात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस सारख्या मोहीमेचा भाग दिसू शकतो. त्यामुळे काँगे्रस सावध पावले टाकतांना दिसून येत असले तरी, यावेळी शिवकुमार यांची समजूत काढणे काँगे्रसला कठीण जाणार आहे.

COMMENTS