Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाटोदा तहसीलवर गायरान धारकांचा धडकला मोर्चा

पाटोदा प्रतिनिधी - धारूर तालुक्यातील गायरान धारक गेल्या अनेक वर्षांपासून गायरान जमिनी कसून आपली उपजीविका भागवीत आहेत. पाटोदा शहराच्या विविध भागा

सलमान खान ची भाची बाॅलिवूडमध्ये करणार पदार्पण
 ‘गुलाबराव तुमचा माज उतरवणार’ ; सुषमा अंधारें 
मला अडकवण्यासाठी परमबीर सिंहांचा वापर

पाटोदा प्रतिनिधी – धारूर तालुक्यातील गायरान धारक गेल्या अनेक वर्षांपासून गायरान जमिनी कसून आपली उपजीविका भागवीत आहेत. पाटोदा शहराच्या विविध भागात राहणार्‍या घर धारकांना व पाटोदा तालुक्यातील गायरान धारकांना पंजाब न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेऊन दारू तालुक्यातील जमीनधारक व घर धारकांना नोटीसा देण्यात येत आहेत. वास्तविक पाहता पाटोदा तालुक्यातील गायरान धरकांनी मूळ कागदपत्र व पुरव्यासहीत प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर केले असतांनाही, त्यांना राज्य शासनाकडून नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. त्या नोटिसा रद्द करून अन्यायकारक निर्णय मागे घेण्यासाठी युवा रिपाइं प्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आदेशावरून मंगळवार (दि.13) जून रोजी पाटोदा तालुका रिपाइंकडून पाटोदा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पाटोदा तालुका अध्यक्ष नरेंद्र जावळे यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा तहसीलवर धडकला.
मोर्चेकर्‍यांनी पाटोदा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, अक्षय भालेराव याच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. गायरान धारकांना व घर धारकांना देण्यात आलेल्या नोटीसा रद्द करण्यात याव्यात. सन 1990 च्या गायरान जमिनी नियमाकुल करण्याच्या शासन निर्णयाची मुदत वाढ 2005 पर्यंत देण्यात यावी. या मागण्याचे निवेदन तहसीलदार पाटोदा यांना देण्यात आले. यावेळी नरेंद्र जावळे, संकट जाधव, नवनाथ जावळे, बाळासाहेब जावळे, किशोर उपदेशी, राजपाल शेंडगे, अमंत जावळे, सय्यद साजेद, आनंद जावळे, दिलीप कोतन, संदिप गायकवाड, हरीश मस्के, उमेश क्षीरसागर, रवी क्षीरसागर, आकाश वाघमरे, इनकर पारनेर, नाना मिसाळ, संजय ससाणे, सचिन वाघमारे,दादा गायकवाड, मधुकर पायाळ, निखील पारवे यांच्यासह शेकडो गायरान धारक व कार्यकर्ते मोर्चात उपस्थित होते.

COMMENTS