उत्तरप्रदेशात उद्या शेतकऱ्यांची ‘किसान महापंचायत’… आम्हाला रोखू शकत नाही : टिकैत यांचा इशारा

Homeताज्या बातम्यादेश

उत्तरप्रदेशात उद्या शेतकऱ्यांची ‘किसान महापंचायत’… आम्हाला रोखू शकत नाही : टिकैत यांचा इशारा

वेब टीम : दिल्लीनव्या कृषी कायद्याच्या विरोधात पुन्हा एकदा केंद्र सरकार विरुद्ध शेतकरी असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्या या

पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच
समृद्धी नव्हे मृत्यूचा महामार्ग
अमिताभ बच्चन आणि समीर चौगुले यांच्या भेटीचा फोटो पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले

वेब टीम : दिल्ली
नव्या कृषी कायद्याच्या विरोधात पुन्हा एकदा केंद्र सरकार विरुद्ध शेतकरी असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्या या नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये संयुक्त किसान मोर्चाने महापंचायतीचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, असा विश्वास भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केला. महापंचायतीसाठी किती लोक जमतील हे सांगणं अवघड आहे. मात्र, मोठ्या संख्येनं लोक पोहचतील.

शेतकऱ्यांना महापंचायतीपर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कोणीही जर आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला तर त्यांना फोडून काढू आणि महापंचायतीत पोहोचू, असा इशाराही राकेश टिकैत यांनी दिला.

टिकैत म्हणाले. महापंचायतीसाठी पंजाबमधून जवळपास दोन हजार शेतकरी मुझफ्फरनगरला येण्याची शक्यता आहे. ते अमृतसरहून पहाटे ४ वाजता, जालंधरमधून सकाळी ५ वाजता आणि लुधियानाहून सकाळी ६ वाजता एक्स्प्रेस ट्रेन पकडतील.

दिल्ली सीमेवरील आंदोलनस्थळावरून ४०० ते ५०० शेतकरी महापंचायतीकडे कूच करतील. टिकरी आणि गाजीपूर सीमेवरून शेतकरी बसने मुझफ्फरपूरसाठी निघत आहेत.

शुक्रवारी रात्री दोन बस मुझफ्फरनगरसाठी रवाना झाल्या, आज शनिवारी सकाळी आणखी दोन बस गेल्या असून इतर बस रात्री शेतकऱ्यांना घेऊन निघतील. महापंचायतीसाठी गावांमधून मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत, असंही राकेश टिकैत यांनी सांगितलं.

ही महापंचायत केवळ निवडणुकीशी जोडलेली नाही. युपीमध्ये सहा महिन्यांनी निवडणुका होणार आहेत. तिथले शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यूपीमध्ये विजेचे दरही सर्वाधिक आहेत.

२०१६ पासून उसाच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही. केवळ पाच रुपये, पाच पैसे प्रति किलोने दरात वाढ करून तुम्ही शेतकऱ्यांचा अपमान करताय का? असा प्रश्नही राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला विचारला.

महापंचायत निर्विघ्न पार पडावी, याची जबाबदारी ५ हजार स्वयंसेवकांवर सोपवण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी ओळखपत्र देण्यात येणार आहे. शिवाय काही अडचण आल्यास सर्व स्वयंसेवकांना आपत्कालीन क्रमांक देण्यात आला आहे.

महापंचायतीची संपूर्ण तयारी झाली आहे. पंचायतीच्या मुख्य व्यासपीठापर्यंत कोण-कोण पोहोचू शकतं, हे बघावं लागेल. तसेच गर्दीमुळे जे पोहोचू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती टिकैत यांनी दिली.

COMMENTS