Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संघर्ष धान्य बँकेकडून वृद्धाला किराणाची मदत

तलवाडा प्रतिनिधी -  गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथील श्री शेख अब्दुल सत्तार यांना संघर्ष धान्य बँकेकडून अकराशे रुपये किरणाची मदत देण्यात आली.श

पोलिसांनी अतुल लोंढेच तोंड दाबल तरीही… | LOKNews24
भाजप सत्ता आणि वाद
चाळीस कामगार अजूनही बोगद्यातच अडकलेले

तलवाडा प्रतिनिधी –  गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथील श्री शेख अब्दुल सत्तार यांना संघर्ष धान्य बँकेकडून अकराशे रुपये किरणाची मदत देण्यात आली.श्री अब्दुल सत्तार हे वयाने थकलेले व अपंग आहेत.त्यांना कुठलाही कामधंदा होत नाही.त्यांच्या पत्नी ह्या मोलमजुरीला जातात व त्यामध्येच त्यांचा प्रपंच चालतो.शेख अब्दुल सत्तार हे गेवराई येथे भिक्षा मागतात व उदारनिर्वाह चालवतात.त्यांना जमीन जुमला नाही त्यामुळे अतिशय हलकीचे जीवन ते जगत आहेत.आज मारुती मंदिराजवळ त्यांनी आपली व्यथा संघर्ष धान्य बँकेचे अध्यक्ष झेंडेकर सर. यांच्या जवळ सांगितली तसेच त्यांचे गावकरी श्री भिवाजी बहिर हे यावेळी उपस्थित होते. त्यांनीही सांगितले की खरोखरच सर यांची परिस्थिती हालाखीची आहे. यांना मदत केल्यास बरे होईल.म्हणूनच संघर्ष धान्य बँकेच्या दात्याकडून आलेल्या रकमेमधून आज श्री शेख अब्दुल सत्तार यांना अकराशे रुपये किराणाची मदत करण्यात आली.मित्रांनो संघर्ष धान्य बँक गेल्या पाच वर्षांपासून धर्मभेद,जातीभेद न मानता अनेक गरजवंत कुटुंबाला मदत करत आहे. आपणही आपली मदत संघर्ष धान्य बँकेकडे जमा केल्यास ती योग्य गरजवंतापर्यंत पोहोच केली जाईल असे संघर्ष धान्य बँकेचे अध्यक्ष झेंडेकर सर यांनी सांगितले

COMMENTS