Homeताज्या बातम्यामनोरंजन

उन्हाचा वाढता पारा अन् दररोज शेकडो शुभकार्यांना उपस्थित राहणारं धस कुटुंबजनतेशी जपलेलं आत्मीयतेचं नातं..!

आष्टी, पाटोदा आणि शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस आणि धस कुटुंब सध्या मतदारसंघात सातत्याने जनसंपर्क दौर्‍यावर असल्याचे चित्र पाहायला मि

आष्टी येथे ’पाटील फार्मा एजन्सीज’चे उद्घाटनआ.सुरेश धस,माजी आ.साहेबराव दरेकर, भिमराव धोंडे, सतिश शिंदे, आदींनाथ महाराज दानवे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
आष्टीत मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेच्या कामांचा आढावाप्रलंबित रस्ते तातडीने पूर्ण करा; दर्जेदार कामांना प्राधान्य-आ.सुरेश धस
तर्कशक्ती, अध्यात्म आणि समाजप्रबोधनाचा अनोखा संगमह.भ.प. राजू महाराज लोखंडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवपद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने व अभिनेत्री मेघना झुझम यांच्या हस्ते सन्मान



आष्टी, पाटोदा आणि शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस आणि धस कुटुंब सध्या मतदारसंघात सातत्याने जनसंपर्क दौर्‍यावर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या उन्हाच्या तडाख्यातही दररोज शेकडो शुभकार्यांना उपस्थित राहत धस कुटुंब नागरिकांशी जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ करत आहेत.
मतदारसंघातील विविध गावांमध्ये आयोजित विवाह सोहळे, धार्मिक कार्यक्रम, सत्कार समारंभ, गृहप्रवेश, वाढदिवस तसेच इतर सामाजिक उपक्रमांना आ. सुरेश धस,सौ.प्राजक्ताताई धस,मा.जि. प.सदस्य देविदास धस,युवा नेते जयदत्त धस,श्याम धस,सागर धस व संपूर्ण धस कुटुंब आवर्जून उपस्थित राहत आहे. प्रत्येक ठिकाणी नागरिकांशी आत्मीयतेने संवाद साधत शुभेच्छा देत आहेत. राजकीय जबाबदार्‍यांसोबत सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे नेतृत्व म्हणून आ. सुरेश धस यांची वेगळी ओळख आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असतानाही सकाळपासून रात्रीपर्यंत मतदारसंघात सुरू असलेली त्यांची धावपळ असते.  विविध कार्यक्रमांसाठी येणार्‍या प्रत्येक निमंत्रण पत्रिकेची स्वतः आ. सुरेश धस दखल घेत आपलं माणूस या कार्यक्रमाला गेलं पाहिजे या भावनेतून शक्य तितक्या प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते.जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध जपण्याचा प्रयत्न आ. सुरेश धस व संपूर्ण कुटुंब सातत्याने करत आहेत. त्यामुळे उन्हाचा पारा वाढला, पण जनसंपर्काचा उत्साह कमी झाला नाही, अशी भावना मतदारसंघातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

COMMENTS