Homeताज्या बातम्या

बिश्‍नोई टोळीतील एकाला राजस्थानमधून अटक

पुणे : पुणे पोलिसांनी मंतरवाडी येथील गोळीबार आणि पाच कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी गुन्हे शाखेने महत्त्वपूर्ण यश मिळवत बिश्‍नोई टोळीशी संबंधित एका

कुख्यात घायवळ टोळीचे मोक्कातील फरार आरोपी जेरबंददोघे ताब्यात ; कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे सापळा
मंत्री झिरवाळ प्रकरणात आरोपीची;गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव
पुण्यात बिष्णोई गँगकडून खंडणीच्या धमक्याव्यापार्‍याकडे दोन कोटी रुपयांची केली मागणी
पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये मोठी कारवाई; मंतरवाडी गोळीबार अन् 5 कोटींच्या  खंडणी प्रकरणी बिश्नोई गँगचा हस्तक अटकेत


पुणे : पुणे पोलिसांनी मंतरवाडी येथील गोळीबार आणि पाच कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी गुन्हे शाखेने महत्त्वपूर्ण यश मिळवत बिश्‍नोई टोळीशी संबंधित एका सक्रिय सदस्याला राजस्थानमधून अटक केली आहे. पवन राम असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, त्याला राजस्थानातील हनुमानगड परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने तांत्रिक तपास, दूरसंचार माहिती आणि गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या अटकेमुळे शहरातील व्यापारी वर्गात निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. फुरसुंगी परिसरातील मंतरवाडी येथील एका स्टील गोदामाच्या मालकाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणीची मागणी मान्य करण्यासाठी दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने गोदामाबाहेर गोळीबार करण्यात आल्याचा आरोप आहे. जून महिन्याच्या उत्तरार्धात दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी हवेत चार गोळ्या झाडून परिसरात दहशत निर्माण केली होती. विशेष बाब म्हणजे, संबंधित व्यावसायिक तक्रार नोंदविण्याच्या प्रक्रियेत असतानाच ही घटना घडल्याने व्यापार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या संपूर्ण प्रकाराचे चित्रण परिसरातील देखरेख कॅमेर्‍यांमध्ये झाले असून, त्यानंतर त्याचे दृश्य समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले होते. गोळीबारानंतर टोळीशी संबंधित काही व्यक्तींनी समाजमाध्यमांद्वारे या कृत्याची जबाबदारी स्वीकारल्याचे समोर आले. तसेच खंडणीची रक्कम न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा स्वरूपाच्या धमक्याही देण्यात आल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्‍लेषणातून आरोपींचे धागेदोरे राजस्थानपर्यंत पोहोचले आणि त्यानुसार पथकाने तेथे जाऊन पवन रामला अटक केली. सध्या त्याची सखोल चौकशी सुरू असून, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर फरार संशयितांचा आणि मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात येत आहे. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदींनुसार पुढील कारवाई करण्याची तयारी पोलिसांकडून सुरू असल्याचे समजते. पुण्यात वाढत्या संघटित गुन्हेगारीविरोधात ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, व्यापारी आणि उद्योजकांच्या सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा अधिक सजगपणे काम करत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

COMMENTS