Homeताज्या बातम्यादेश

रेल्वे स्टेशनवरील स्क्रीनवर सुरू झाला पॉर्न व्हिडिओ

बिहारमधील पाटणा रेल्वे स्टेशनवरील घटना

पाटणा/वृत्तसंस्था ः रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना माहिती देण्यासाठी लावण्यात आलेल्या स्क्रीनवर अचानक पॉर्न व्हिडिओ सुरू झाल्याचा धक्कादायक प

कानाखाली मारल्याचा राग सहन न झाल्याने छातीवर झाडली गोळी
राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न मार्गी : आ. रोहित पवार | पहा ‘आपलं अहमदनगर’ | LokNews24
रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वक्तृत्व स्पर्धेत यश

पाटणा/वृत्तसंस्था ः रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना माहिती देण्यासाठी लावण्यात आलेल्या स्क्रीनवर अचानक पॉर्न व्हिडिओ सुरू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारची राजधानी असलेल्या पाटणा जंक्शन रेल्वे स्थानकावर ही घटना घडली असून त्यानंतर आता रेल्वेने दोषींविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
 स्क्रीनवर माहिती पाहत असतानाच तिथे अचानक अश्‍लील व्हिडिओ सुरू झाल्यानं या लाजिरवाण्या घटनेमुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे आता या घटनेमुळं रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या पाटणा रेल्वे स्टेशनवरील टीव्ही सेटवर अचानक पॉर्न व्हिडिओ सुरू झाला. सुरुवातीला प्रवाशांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु त्याचा आवाज मोठ्याने येऊ लागल्याने प्रवाशांनी थेट रेल्वे अधिकारी आणि पोलिसाकडे या प्रकरणाची तक्रार दिली. धक्कादायक बाब म्हणजे हा पॉर्न व्हिडिओ काही सेकंद नाही तर चक्क तीन मिनिटे सुरुच होता. तरीदेखील त्याकडे रेल्वेच्या अधिकार्‍यांनी लक्ष दिले नाही. त्यानंतर रेल्वेच्या अधिकार्‍यांनी व्हिडिओ बंद करत संबंधित एजन्सीवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. रेल्वेच्या अधिकार्‍यांनी आरोपी कम्युनिकेशन एजन्सी, ऑपरेटर आणि त्याच्या कर्मचार्‍यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पाटणा रेल्वे स्टेशनवर एकूण 10 प्लॅटफॉर्म आहे. त्यातील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर स्क्रीन्स लावण्यात आलेल्या आहे. त्यातील एका प्लॅटफॉर्मवर सलग तीन मिनिटे पॉर्न व्हिडिओ सुरू होता. त्यानंतर आता रेल्वे स्टेशनवरील सर्व सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली जात असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

COMMENTS