Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगेंनी उपोषण केले स्थगित

जालन्यात आंदोलकांनी पेटवली बस

जालना/मुंबई ः राज्यात मराठा आंदोलन पुन्हा एकदा पेटतांना दिसून येत आहे. मराठा आंदोलकांनी सोमवारी जालन्यात एसटी बस पेटवून दिल्याने तणाव बघायला मिळा

मनोज जरांगे राज्यभर करणार रास्ता रोको
मनोज जरांगे पाटलांनी लुटला क्रिकेटचा आनंद
आरक्षणप्रश्‍नी तोडगा नाही, केवळ दिशाभूल

जालना/मुंबई ः राज्यात मराठा आंदोलन पुन्हा एकदा पेटतांना दिसून येत आहे. मराठा आंदोलकांनी सोमवारी जालन्यात एसटी बस पेटवून दिल्याने तणाव बघायला मिळाला. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासोबतच मनोज जरांगे यांनी देखील सोमवारी शांततेची भूमिका घेत आपले आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपोषण मागे घेत आहे. त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. दोन दिवसात आपण पुढील दिशा ठरवणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीमध्ये साखळी उपोषण सुरुच राहणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. अंतरवाली सराटीतून त्यांनी मराठा बांधवांना त्यांच्या घरी परतण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. तसेच शांततेत धरणे आंदोलन सुरू ठेवा अशी विनंती त्यांनी केली आहे. दरम्यान, परिस्थिती बघून शहाणी भूमिका घ्यावी लागेल, एकाही मराठ्याला त्रास झाला नाही पाहिजे. आता सर्व समाज बांधवांनी घराकडे जावे आणि संचारबंदी उठल्यावर आंतरवालीत यावे असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. मुंबईला निघालेल्या जरांगे यांनी सध्या नमती भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान सोमवारी राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगर, जालना अणि बीड या तीन जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल 10 तास इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. याबाबत गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी आदेश काढले आहेत.  आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून जालना, बीड आणि संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा देत त्यांनी मुंबईला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर उपोषण करण्याचा रविवारी इशारा दिला होता. दरम्यान, ते पुन्हा अंतरवली सराटी येथे माघारी फिरले आहेत. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर जालना, संभाजीनगर, बीड येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या सोबतच येथील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. तर जालना येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बस सेवा देखील बंद ठेवण्यात आली आहे.

राज्यभरात 1041 जणांवर गुन्हे दाखल – मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी आणि खालच्या भाषेत टीका केल्यानंतर आतापर्यंत सबुरीचे धोरण बाळगत असलेले राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. यापूर्वी पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु, सोमवारी पहिल्यांदाच पोलिसांकडून थेट मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य सरकारकडून जवळपास 1041 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी 425 गुन्हे मराठवाड्यात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून मनोज जरांगे यांच्या सहकार्‍यांची धरपकड सुरू झाली आहे. रविवारी रात्री पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या सहकार्‍यांसह एकूण 5 लोकांना ताब्यात घेतले आहे. जरांगे पाटील यांचे निकटवर्ती म्हणून समजले जाणार्‍या श्रीराम कुरणकर, शैलेश पवार, बाळासाहेब इंगळे यांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतलेले आहे.

COMMENTS