Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शुभांगी पाटील असणार ‘मविआ’च्या उमेदवार – नाना पटोले

नागपूर/प्रतिनिधी ः राज्यातील नाशिक पदवीधर निवडणुकीचा घोळ अद्यापही सुरूच असून, महाविकास आघाडी काय भूमिका घेते, याकडे भाजपचे लक्ष असले तरी, ठाकरे ग

बांधकाम कामगारांनो एकीची वज्रमुठ बांधा ः डॉ. करणसिंह घुले
122 खासदार, आमदारांवर मनी लॉड्रिंगचे आरोप
तृणमूलचे नेते मुकुल रॉय बेपत्ता

नागपूर/प्रतिनिधी ः राज्यातील नाशिक पदवीधर निवडणुकीचा घोळ अद्यापही सुरूच असून, महाविकास आघाडी काय भूमिका घेते, याकडे भाजपचे लक्ष असले तरी, ठाकरे गटाने यापूर्वीच शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील असतील असे संकेत दिले आहेत. त्यामुळे शुभांगी पाटील विरुद्ध सत्यजीत तांबे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीवर भाष्य करतांना नाना पटोले म्हणाले, जो काही निर्णय द्यायचा तो हायकमांड देईल. आमचे जे निर्णय झाले आहेत त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली आहे. नागपूरची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे आणि नाशिकमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून शुभांगी पाटील आमच्या उमेदवार आहेत. याआधी नाना पटोले म्हणाले होते, अद्याप कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. शिवसेनेने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला या माध्यमांनी चालवलेल्या बातम्या आहेत. आमचा अंतिम निर्णय होईल आणि सोमवारी (16 जानेवारी) नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी महाविकासआघाडीचा उमेदवार जाहीर करू, असे पटोले यांनी म्हटले होते. त्यानंतर सोमवारी त्यांनी माध्यमांशी बोलतांना आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी शुभांगी पाटील यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. मात्र यासंदर्भात हायकमांडचा निर्णय झाला नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय हा राज्यस्तरावर काँगे्रसने घेतल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS