परम श्रद्धेय श्री संत मुक्ताई पालखीच्या निमित्ताने बीड शहरातील स्वच्छतेचे कसे तीन तेरा नऊ बारा वाजले आहेत हे सर्वांसमोर आले आहे. नगरपालिकेच्या ने

परम श्रद्धेय श्री संत मुक्ताई पालखीच्या निमित्ताने बीड शहरातील स्वच्छतेचे कसे तीन तेरा नऊ बारा वाजले आहेत हे सर्वांसमोर आले आहे. नगरपालिकेच्या नेता – प्रतिनिधींचे अक्षरशः वाभाडे निघालेले आहेत.
नुकत्याच झालेल्या बीड नगरपालिका निवडणुकीमध्ये बीड शहराच्या विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पा ठोकणारे सर्वच लोकप्रतिनिधी हे नियमित स्वच्छता मोहिम राबविण्यामध्ये असफल ठरले आहेत. अक्षरशः परम श्रद्धेय आदरणीय श्री संत आई मुक्ताई यांच्या पालखीच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर यांना बीड शहराची व ’मुक्ताई’ पालखी मार्गाची स्वच्छता देखील करणे शक्य झाले नाही. यानिमित्ताने त्यांची कार्यक्षमता चव्हाट्यावर आली आहे तसेच नगरपालिकेच्या कारभारावरच फार मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मुक्ताई पालखीची पूर्वतयारी करण्यापेक्षा जनतेला संघर्षा मधून मिळालेल्या रस्त्यांच्या कामांचे श्रेय लाटण्यामध्ये हे सर्वजण व्यस्त होते, यांना त्यात मजा वाटत होती. खरंच बीड नगरपालिकेची गत अशी झाली आहे की एक नाही कामाचा आणि सारा गाव ’मामाचा’… यातच दरवर्षीप्रमाणे मुक्ताईची पालखी येणार आहे याचा या सगळ्यांना विसरत पडला होता. आज खरचंच पालकमंत्री दि. स्वर्गीय अजित दादा पवार हयात असते तर नगरपालिकेच्या कामांमध्ये कुचराई झाली नसती आणि लोकप्रतिनिधींचे असे वाभाडे नक्कीच निघाले नसते हे स्पष्टच आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या नावाने ओळखला जाणारा सुभाष रोड हा मार्ग आजही सर्व बीडकरांच्या मनामनावर ’ने.सुभाष रोड’ या नावानेच कोरलेला आहे. आझाद हिंद सेना नावाने भारत देशाची पहिली आर्मी स्थापन करणारे व ’तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा’ असा नारा भारतीयांच्या तना- मनामध्ये बुलंद करत ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध पहिले सशस्त्र युद्ध पुकारणारे स्वातंत्र्यसंग्रामाचे महानायक नेताजी सुभाष बाबू यांची ती बीडकरांसाठी एक कायमस्वरूपी आठवण आहे. त्यामुळे बीडकरांच्या मनामध्ये व स्मरणामध्ये हा रस्ता कायमस्वरूपी नेताजी सुभाष रोड नावानेच वास करीत राहील यात यत्किंचितही कोणालाही शंका नाही असे बीड शहरातील जनतेचे व जनतेच्या वतीने बीड शहर बचाव मंचाचे प्रामाणिक ठाम मत आहे आणि कायम राहील.

COMMENTS