Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“समाज बांधवांनी संघटित होवून संघर्ष केलातरच नवक्रांती निर्माण होईल” : रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे

Oplus_16908288 बीड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील उपेक्षितांना सामाजिक शैक्षणिक व आर्थिक प्रवाहात आणून त्यांचे सक्षमीकरण करण्यासा

शेकापूर ग्रामपंचायत अधिकार्‍यावर गुन्हा; प्रत्युत्तरात तक्रारदारावरही केस दाखल
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त पाथर्डीत विविध उपक्रम
महामानवांच्या जयंतीनिमित्त केज बसस्थानकात ‘अक्षर’ सेवाभावी संस्थेकडून पाणपोईचे लोकार्पणपाच वर्षांची अखंड परंपरा; प्रवाशांची तहान भागवण्यासाठी स्तुत्य उपक्रम
Oplus_16908288

बीड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील उपेक्षितांना सामाजिक शैक्षणिक व आर्थिक प्रवाहात आणून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती करून उपेक्षित समूहातील समाज बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे हक्क व अधिकार मिळवून दिले. आगामी काळात युवकांनी थोर महापुरुषांचे विचार आत्मसात करून नवक्रांती घडविण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करावा. असे आवाहन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी मौजे कुमसी ता.जि.बीड या गावी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संयुक्त जयंती निमित्त आयोजित जयंती उत्सवात केले.
थोर महापुरुषांनी कुठल्याही एका जातीच्या समाजासाठी काम केलेले नाही. महापुरुषांना जयंतीच्या माध्यमातून एका समाजापुरते मर्यादित ठेवू नका महापुरुषांचे विचार आत्मसात करून उपेक्षित समाजातील सर्व युवकांनी महापुरुषांच्या जयंत्या नाचून नाहीतर वाचून साजर्‍या कराव्यात हेच सर्वात मोठे अभिवादन आहे. वर्षभरातील 365 दिवस वाचन करून जयंती उत्सव साजरा करा व आपल्या प्रश्नांची सोडवणूक करून घेण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करावा. यावेळी इंजि. विष्णू देवकते, अर्जुन क्षीरसागर, आनंद पिंगळे, संतोष जाधव, जयंत करपे (सर), भारत कानडे, अनुरत वीर, भगवान वाघमारे, नारायण करपे, अमोल गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, दिलीप देवडे, नितीन वाघमारे, रोहन घोडके, संभाजी थोरात, अमोल वाघमारे, अनिल भिसे, नामदेव वाघमारे, रतन वाघमारे, सचिन बीडकर, भरत करपे यांच्यासह शेकडो अनुयायी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक किरण वाघमारे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक महादेव इंनकर यांनी केले.

COMMENTS