Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किनवटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी; भीम अनुयायांचा जनसागर

किनवट :भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती किनवट शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली

डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृतांच्या जीवनात आत्मसन्मानाचे बीज पेरले – डॉ. सतीश साळुंके
राहाता शहरात महात्मा फुले यांना अभिवादन
महात्मा ज्योतिबा फुले समग्र क्रांतीचे प्रणेते-आनंद  गायकवाड

किनवट :
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती किनवट शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. ’महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सव समिती’ आणि ’भारतीय बौद्ध महासभा’ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील मुख्य पुतळा परिसरात सकाळी 11 वाजता मुख्य सोहळा पार पडला. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या हस्ते पंचशील ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी अनिल उमरे व महेंद्र नरवाडे यांनी सामुदायिक बुद्ध वंदना घेतली. स्थानिक आमदार भीमराव केराम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले. जयंतीनिमित्त येणार्‍या अनुयायांसाठी शहरात ठिकठिकाणी सेवाभावी उपक्रम राबवण्यात आले. ड. दिलीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ड. सुनील येरेकार यांनी खिचडी आणि पाणी बॉटलचे वाटप केले.नगरसेविका ललिता मुनेश्वर यांच्याकडून बुंदी लाडू वाटप करण्यात आले. गुरुस्वामी पवार यांनी शीतलपेय तर अन्य कार्यकर्त्यांनी थंड मठ्ठ्याचे वाटप करून उन्हाच्या तडाख्यात नागरिकांना दिलासा दिला. बस स्थानक परिसरात आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते, तर जेतवन बुद्ध विहारात नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याला युवा नेते करण येंड्रलवार, शिवसेना शहर प्रमुख प्रशांत कोरडे, श्रीनिवास नेम्मानीवार, प्रा. रामप्रसाद तौर, प्रा. दगडू भरकड, डॉ. सुनील व्यवहारे, दादाराव कयापाक, विनोद भरणे, राजु शेळके, आशिष शेळके, मारोती मुनेश्वर, उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे, मिलिंद धावारे, विवेक ओंकार, शंकर नगराळे, आकाश आळणे, ड. आकांक्षा आळणे, निखिल कावळे, ड. सम्राट सर्पे, साजिद बडगुजर, गोकुळ भवरे, प्रा. रविकांत सर्पे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी निखिल सर्पे, आकाश सर्पे, अनिकेत भरणे, सिद्धार्थ भरणे, ऑलफ्रेंड ठमके, संघर्ष घुले आणि अनिल कांबळे यांनी परिश्रम घेतले. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

COMMENTS