Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडमध्ये साहित्य-कला क्षेत्राला नवी दिशाराजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजनेअंतर्गत समिती गठीत; बाबुराव पाटील यांची निवड

भोकर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने नांदेड जिल्ह्यात राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कला

देगलूरमध्ये खळबळ : नगराध्यक्षा व कुटुंबीयांवर जुगार क्लब चालवण्याचे आरोप; अज्ञात पॅम्पलेट व्हायरल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आ.आनंदराव  बोंढारकर यांनी घेतली सदिच्छा भेट
निखिल लातूरकर यांच्या पुढाकारातून प्रथमेशच्या वैद्यकीय शिक्षणाच्या स्वप्नांना बळ; कॅप्टन आशिष दामले यांची एक लाखांची मदत

भोकर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने नांदेड जिल्ह्यात राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कलाकारांच्या निवडीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत भोकर येथील पत्रकार व साहित्यिक बाबुराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
ही निवड माजी मुख्यमंत्री तथा खासदार  अशोकराव  चव्हाण यांच्या शिफारशीवरून तसेच नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या मान्यतेनंतर करण्यात आली असून, शासन निर्णयानुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. गेल्या तीन दशकांपासून साहित्य, कला आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले पाटील हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. साहित्य निर्मितीसोबतच ढोलकी-तबला वादन, गायन, चित्रकला तसेच वृत्तपत्र क्षेत्रात त्यांनी सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. बहुजन समाजाच्या प्रश्नांवर भान ठेवून कार्य करणारे, सामाजिक जाणीव जपणारे अष्टपैलू कलावंत अशी त्यांची ओळख आहे. कलाकारांच्या निवडीसाठी गठीत समितीत त्यांच्या समावेशामुळे नांदेड जिल्ह्यातील साहित्य व कला क्षेत्राला सकारात्मक दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कला-संस्कृती जपणार्‍या आणि सामाजिक बांधिलकी जपणार्‍या व्यक्तींचा सहभाग या योजनेला अधिक परिणामकारक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना मानधन सन्मान योजनेचा लाभ पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने मिळावा, यासाठी समिती कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले. या निवडीमुळे जिल्ह्यासह बाबुराव पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

COMMENTS