Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नायगावच्या शेतकर्‍याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

सातारा / प्रतिनिधी : उद्योजकाने शेतीचे नुकसान केल्याने संतप्त झालेल्या नायगाव (ता. खंडाळा) येथील संजय गोपाळ नेवसे या शेतकर्‍याने आज जिल्हाधिकारी

डिजीक्लेममुळे शेतकर्‍यांचा फायदा होईल ः कृषीमंत्री तोमर
किल्ल प्रतापगड संवर्धनात शासन कमी पडणार नाही : ना. एकनाथ शिंदे
सोमवारी जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन

सातारा / प्रतिनिधी : उद्योजकाने शेतीचे नुकसान केल्याने संतप्त झालेल्या नायगाव (ता. खंडाळा) येथील संजय गोपाळ नेवसे या शेतकर्‍याने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून संबंधित शेतकर्‍याला ताब्यात घेतले. उद्योजकाने केलेल्या शेतीच्या नुकसानीचा पंचनामा करून मला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नेवसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याची नोटीस दिली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळपासून पोलीस बंदोबस्त व अग्निशामक सज्ज ठेवण्यात आले होते. अचानक नेवसे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेश द्वारासमोर आले व त्यांनी पिशवीतून आणलेली रॉकेलची बाटली अंगावर ओतून घेतली.
पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात नेवसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात शेतकरी संजय नेवसे यांनी सांगितले, की त्यांच्या मालकी हक्काच्या शेतीचे आठ महिन्यांपासून नुकसान होत आहे. याबाबत तलाठी, मंडलाधिकारी, प्रांताधिकारी, तसेच जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी निवेदने दिली. पण आमच्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले. उलट तत्कालीन तहसीलदार व तलाठी मनीषा शिंदे यांनी खोटा पंचनामा करून शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडवला आहे. त्यामुळे मी वैतागून आत्मदहनाचा निर्णय घेतला असल्याचे नेवसे यांनी सांगितले.

COMMENTS